सत्य समोर आले तर लोक नक्की विश्वास ठेवतील!
By admin | Published: July 27, 2015 12:25 AM2015-07-27T00:25:52+5:302015-07-27T00:25:52+5:30
पाकमध्ये मी जे काही करीत होतो ते एक ठरावीक उद्देश मनात ठेवून करीत होतो. कारण तसे करण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा पर्यायही नव्हता.
तुम्ही पाकला कसे पोहोचलात?
१७ तारखेला आम्ही कराचीमार्गे दुबईला जाणाऱ्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानात बसलो. पण कराची येथे एका पाकिस्तानी एजंटनं आम्हाला एस्कॉर्ट केलं. इमिग्रेशनच्या कोणत्याही प्रक्रिया न करता त्यानं आम्हाला कराची विमानतळाबाहेर, ‘कायदे आजम’ विमानतळाच्या बाहेर काढलं.
मग, सांगा बघू का परत आलात?
हेच, या स्फोटांमागे कोण आहे हे दाखवून देण्यासाठी. त्यामागे मेमन कुटुंब नव्हते. त्यामागे नेमके कोण लोक होते ते मला माहीत आहे. त्यांचे पत्ते मला कळाले आहेत. पाक सरकारचाही त्यात सहभाग होता, हेही मला समजले. हे सर्व जगातील लोकांना सांगण्यासाठी मी (परत) आलो आहे.
तुम्ही ११ मार्च रोजी मुंबईहून दुबईकडे रवाना झालात..
याकूब : हो.
पाकिस्तानी एजंट म्हणजे कोण?
त्याचे नाव आसिफ होते. त्याला टक्कल होते. त्याने आम्हाला विमानतळाच्या आतून अगदी बाहेरपर्यंत एस्कॉर्ट केले...
आणि तुमच्या पासपोर्टवर स्टॅम्प मारले गेले?
नाही. इमिग्रेशन किंवा कस्टम्सच्या कुठल्याची औपचारिकता (पूर्ण) केल्या गेल्या नाहीत.
म्हणजे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला कराचीत विमानातून उतरवून घेतले आणि कोणत्याही औपचारिकता न करता त्याने तुम्हाला बाहेर काढले? मग तुमच्या पासपोर्टचे काय? तुमचा भारतीय पासपोर्ट तुम्ही त्याच्याकडे दिलात?
हो, सर्वप्रथम त्याने आमचे भारतीय पासपोर्ट आमच्याकडून घेतले व कोणत्याही औपचारिकता न करता त्याने आम्हाला विमानतळाच्या बाहेर काढले.
मग, तेव्हापासून तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट नाही?
हो, त्यानंतर जवळजवळ एक वर्षाने आम्हाला आमचे पासपोर्ट परत मिळाले?
त्यानंतर आसिफने तुम्हाला कुठे नेले?
विमानतळावरून आम्हाला कराची शहरातील तौफिक जालियाँवाला यांच्या बंगल्यात नेण्यात आले. तो बंगला दुराजी कॉलनीत होता.
मग, तुम्ही तेथे राहिलात?
हो, आम्ही तेथे राहिलो.
संपूर्ण कुटुंब तेथेच राहिले होते?
नाही सर्व कुटुंब नाही. कारण १७ तारखेला मी, माझी पत्नी, आई, वडील व धाकटा भाऊ तेथे गेलो. त्यानंतर २० किंवा २१ तारखेला त्याच बंगल्यात कुटुंबातील इतर मंडळी राहायला आली.
त्यानंतर तुम्ही आणखी दुसऱ्या कोणत्या ठिकाणी राहिलात?
त्यानंतर काही दिवसांनी, सुमारे आठ दिवसांनी आम्हाला तौफिक जालियाँवाला यांच्या दुसऱ्या नव्या घरात नेण्यात आले. तूफी कॉटेज असे त्याचे नाव होते. ते गुलशन-ए-इक्बाल भागात होते व त्याचा नंबर १३ डी असा होता. आम्हाला (नंतर) तेथे नेण्यात आले.
आणि हा तौफिक कोण ?
तौफिक हा टायगरचा मित्र आहे. टायगर म्हणजे माझा मोठा भाऊ. मला नक्की माहीत नाही, पण गेली तीन-चार वर्षे ते दुबईत काहीतरी धंदा करीत आहेत. तो टायगरचा धंद्यातील भागीदार आहे. तो पाकिस्तानी आहे व कराची आणि दुबईत त्याचे वास्तव्य असते.
कसला धंदा आहे त्याचा?
मला वाटते की कराचीत त्याचा कन्स्ट्रक्शनचा धंदा आहे; शिवाय त्याची कार डीलरशिपची शोरूमही आहे.
टायगरचाही पाकिस्तानमध्ये कन्स्ट्रक्शनचा धंदा आहे?
नाही.. नाही! टायगरचा पाकिस्तानमध्ये कसलाही धंदा नाही.
पण तुम्ही म्हणालात, ते दोघे मिळून धंदा करतात?
ते दोघे दुबईत धंदा करतात, पाकिस्तानमध्ये नाही.
कसला धंदा करतात ते?
कदाचित स्मगलिंगचा धंदा असू शकेल. आता माझी त्याच्या कामकाजाविषयी खात्री झाली आहे.
कसलं स्मगलिंग?
कसलं स्मगलिंग ते मला माहीत नाही.
पण त्याच्या कामधंद्याविषयी.. बेकायदा कामांविषयी खात्री झाल्याचे म्हणालात... कशी काय खात्री झाली?
कारण, नंतर माझे आणि तौफिकचे चांगले संबंध जुळले.
पण, खरेतर त्याहून चांगले संबंध तुमचे तुमच्या भावाशी होते...
नाही, त्याच्याशी माझे फारसे संबंध नव्हते. त्याच्याशी मी आयुष्यात कधी सलग एक तासही बोलल्याचे मला आठवत नाही.
पण, तुम्ही तर एकाच घरात राहायचात ना?
हो. आम्ही एकाच घरात राहायचो. अगदी लहानपणापासून बरोबर राहायचो. पण, त्याला त्याचे आयुष्य होते, त्याचा स्वत:चे जीवन जगण्याचा स्वतंत्र मार्ग होता. मी माझ्या अभ्यासात मग्न असायचो व माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगत होतो. मी त्याच्या आयुष्यात कधी ढवळाढवळ केली नाही व त्यानेही मला कधी इन्कम टॅक्सविषयी किंवा मी काय करतो ते विचारले नाही. त्यामुळे तसे म्हटले तर आमचे संबंध तेवढे घनिष्ट नव्हते.
पण, तरीही तुम्ही त्याचा हुकूम पाळलात? त्याने (देश सोडून) जायला सांगितले तेव्हा तुम्ही त्याप्रमाणे गेलात..
नाही, त्याचा हुकूम मी पाळला असे नाही. त्या वेळची परिस्थितीच तशी होती.
तुम्ही पाकिस्तानात होतात तेव्हा तुमच्या(साठी) पैशांची व्यवस्था कोण करीत होते?
टायगर आणि तौफिक..
(तुमचा) सर्व खर्च टायगर आणि तौफिक करायचे?
हो.
तुम्ही तर काही कमवत नव्हता, मग कसे काय चालायचे?
अगदी तसंच काही नाही. सहा महिन्यांनंतर आम्हीही थोडेफार कमवायला लागलो.
म्हणजे काय करत होतात?
आम्हीही कन्स्ट्रक्शनचा बिझिनेस करायला लागलो. शिवाय धाकटा भाऊ अयूब तांदळाची निर्यात करायचा. पण हे खरे की, खरी मदत तौफिक जालियाँवाला आणि टायगरचीच झाली.
पण, तुम्ही तर म्हणता (टायगरशी त्याआधी) तुम्ही कधी तासभरही बोलला नव्हता.
ते खरंच. पण टायगरची खूप मदत झाली. पाकिस्तानात मी टायगरकडून खूप मदत घेतली.
१७ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत तुम्ही बँकॉकमध्ये होतात..
हो.
बँकॉकला कशासाठी गेला होतात?
१७ एप्रिलला आम्हाला बँकॉकला नेण्यात आले. ती वेळ अशी होती की नेमके काय घडले ते आम्हाला समजून चुकले होते. तोपर्यंत मला किंवा कुटुंबातील कोणालाही या कशाचीही पुसटशीही कल्पना नव्हती.
कशाचीही म्हणजे?
बॉम्बस्फोटांची व त्यामागील कारस्थानाची...
म्हणजे ते सर्व तुम्हाला बँकॉकला गेल्यावर समजले?
बँकॉकला नाही, आम्ही कराचीला पोहोचल्यानंतर.
अच्छा, मग बँकॉकला तुमच्याबरोबर आणखी कोण-कोण गेले होते?
एक कॅप्टन होते. सरवर.. इलियास उस्मान नावाचा एक अधिकारी होता...
पाकिस्तानी अधिकारी होता?
हो, तो पाकिस्तानचा सरकारी अधिकारी होता.
काय.. त्याचे नाव काय?
तो उस्मानला सांगायचा.. पण आम्हाला नंतर मला कळले की त्याचे नाव कॅप्टन सरवर आहे.
बँकॉकमध्ये कुठे राहात होतात?
तेथे आम्ही एका बंगल्यात होतो.. पट्टाया रोडवर... आम्हाला घरातच (बंद करून) ठेवले गेले होते.. आम्ही कुठेही येत-जात नव्हतो...
त्यांनी तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये नाही ठेवले?
काही जण १६ तारखेला गेले होते. ते हॉटेलमध्ये राहिले. त्याचे नाव होते इंद्रा रिजन्सी. मीही १७ तारखेला तेथे गेलो. नंतर आम्हालाही पट्टाया रोडवरील बंगल्यात नेण्यात आले. तेथे आम्ही २९ एप्रिलपर्यंत राहिलो.
मग सांगा बघू का परत आलात?
हेच, या बॉम्बस्फोटांमागे कोण आहे हे दाखवून देण्यासाठी. आणि त्यामागे मेमन कुटुंब नव्हते. त्यामागे नेमके कोण लोक होते ते मला माहीत आहे. त्यांचे पत्ते मला कळाले आहेत. पाकिस्तान सरकारचाही त्यात सहभाग होता, हेही मला समजले. हे सर्व जगातील लोकांना सांगण्यासाठी मी (परत) आलो आहे.
बँकॉकमध्ये तुमचा खर्च कोण करीत होते?
मला वाटते पाकिस्तानी अधिकाऱ्यांनीच केला असावा. ते यायचे आणि टायगरशी बोलायचे...
पण, तुम्ही चौकशी केली नाही?
नाही, तेव्हा मी ते विचारले नाही.
तुम्ही परत आल्यावर काही जमीन खरेदी केली गेली का?
हो, आम्ही परत आल्यावर तौफिक व टायगरने कराची डेव्हलपमेंट स्कीममध्ये एक भूखंड खरेदी करण्याची व्यवस्था केली होती.
केवढा होता तो भूखंड?
एक हजार यार्ड. तसा चांगलाच ऐसपैस होता.
केवढ्याला घेतला होतात तो भूखंड?
सुमारे ६० लाख रुपये.
६० लाख? आणि कोणी दिले ते पैसे?
टायगर. तौफिक आणि टायगरच सर्व पैसे द्यायचे.
पैशाच्या व्यवहारात तुम्ही टायगरला कधी मदत करायचात? अकाउंटंट म्हणून काम करायचात? मुंबईत त्याच्या वतीने पैसे वगैरे काढायचात?
नाही.. कधीच नाही. मुंबईत नाही व पाकिस्तानातही नाही.
पाकिस्तानात असताना तुम्ही तौफिक सिद्दिकीच्या भावासोबत तेथे एक कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली होती, हे खरे का?
हो. बँकॉकहून परत येत असताना मी या सर्व गोष्टींच्या मुळाशी जाऊन माहिती करून घेण्याचे ठरविले होते. हे सर्व कसे झाले.. बॉम्बस्फोट कसे झाले?, त्यांच्यामागे कोण होते? त्याला कोणाचा वरदहस्त होता? आणि जिवाला धोका आहे वगैरे असे सांगून आमची मुंबईहून आधी दुबईला व नंतर कराचीला नेऊन फरफट का केली गेली या सर्व गोष्टी जाणून घेण्याचे मी ठरविले.
ठीक आहे, मग पुढे?
हं.. तर, पाकिस्तानात मी जे काही करीत होतो ते एक ठरावीक उद्देश मनात ठेवून करीत होतो. कारण तसे करण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा पर्यायही नव्हता. त्यामुळे मी माझा हेतू साध्य करण्यासाठी माहिती घेत असायचो, हे का घडले, कसे घडले व त्यामागे कोण लोक आहेत तसेच या सर्वाचे परिणाम आम्ही का म्हणून भोगायचे?
हं, म्हणजे काय काय घडले ते पाहता असे दिसते की, तुम्हाला दुबईला नेण्यात आले, कराचीला नेण्यात आले. तेथे तुम्ही अगदी आरामात होतात. तेथे तुम्ही ज्या घरात राहात होतात त्याचा बांधकाम खर्चच १.१६ कोटी रुपये होता. पाकिस्तानने तुम्हाला आयडेन्टिटी कार्ड दिले, स्कूल सर्टिफिकेट दिले, तुमचे पुनर्वसन केले..
हो. बरोबर आहे..
पाकिस्तानने हे सर्व का केले असावे, असे आपल्याला वाटते?
या बॉम्बस्फोटांमागे पाकिस्तानी एजंट होते, याविषयी माझी खात्री झाली आहे.
हो, पण त्यांनी तुमच्यासाठी हे सर्व का करावे?
कारण आम्ही टायगरचे कुटुंबीय होतो. ते टायगरसाठी करीत होते. टायगरसोबत त्यांनी व इतरांनी मिळून हे सर्व घडवून आणले होते. त्यामुळे ते हे सर्व टायगरसाठी करीत होते.
हो. जगात अनेक गुन्हेगार आहेत, दहशतवादी आहेत. पण कोणतेही सरकार त्यांची अशी आर्थिकदृष्ट्या काळजी घेत नाही. पण तुमची मात्र तशी काळजी घेतली गेली. असे का बरे झाले असावे?
आम्ही टायगरच्या पाठीशी आहोत, असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी आम्हाला एवढी मदत केली.
म्हणजे तुम्ही टागरच्या पाठीशी होतात? त्याला मदत केलीत?
नाही. कधीच नाही.
मग, त्यांनी तसा निष्कर्ष कसा काढला?
कारण ते टायगरच्या पाठीशी होते. माझ्या कुटुंबालाही येथे आणा, असे टायगरने त्यांना सांगितले. त्यावरून त्यांना वाटले असावे की टायगरचे कुटुंबाशी घनिष्ठ भावनिक संबंध आहेत.. म्हणून तर त्यांनी आम्हाला तेथे नेले.
तसे नव्हते तर तुम्ही तक्रार का केली नाही?
हे पाहा, त्या वेळी परिस्थितीच एवढी भयंकर होती की आम्हाला फक्त आमच्या जिवाची काळजी होती. दुसरा कसलाही विचार आम्ही करू शकत नव्हतो. म्हणूनच आई, वडील व धाकट्या भावंडांना घेऊन आम्ही निघून आलो.
पण, टायगरच्या गॅरेजमध्ये ज्या प्रकारची शस्त्रे व दारूगोळा सापडला तो पाहता त्याच्या कुटुंबाला त्या वेळी जिवाची काळजी पडली होती, यावर विश्वास बसत नाही.
बरोबर आहे. आता त्यावर विश्वास बसणारही नाही. पण जेव्हा सर्व सत्य समोर येईल तेव्हा प्रत्येकाचा यावर विश्वास बसेल...
आता तुम्ही सत्य सांगितलंय ना! तुमच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानी एजंटांनी तुम्हाला दुबईला व नंतर कराचीला नेले. तुमचाही त्यात सहभाग होता..
नाही. आमचा सहभाग होता, असे म्हणता येणार नाही. परिस्थितीच तशी होती म्हणून आम्ही तसे वागलो.
हो, पण तुम्ही काय कुक्कुलं बाळ नव्हतात...
हो. पण, त्या वेळी माझे कुटुंब माझ्यासोबत होते. पत्नी होती, आई-वडील होते, धाकटे भाऊ होते. या सर्वांची मी नेहमीच काळजी घेत असतो. हे सगळे बरोबर नसते व मी एकटा असतो तर मी पाकिस्तानला कधीच गेलो नसतो.
कुटुंबाची काळजी तर प्रत्येक जणच
घेत असतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही एक प्रौढ होतात व तुम्ही स्वखुशीने पाकिस्तानला गेलात व पाकिस्तान सरकारने दिलेले सर्व फायदे तुम्ही तेथे घेतलेत. तेथे तुम्ही स्वत:चे पुनर्वसन केलेत...
फायदे घेण्याची गोष्ट वेगळी आहे. मी तसे केले कारण मी त्यांच्यासोबत आहे, असे मला त्यांना भासवायचे होते. तसे करून तर मला हवी ती सर्व माहिती त्यांच्याकडून काढून घेऊ शकलो..
हो, पण तसे असेल तर तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल? एका क्षणाला तुम्ही त्यांंच्याबरोबर तर दुसऱ्या क्षणाला आमच्याबरोबर असल्याचे सांगत आहात... नंतर तुम्ही आणखी कोणाबरोबर असल्याचे सांगाल...
तसे नाही... पहिल्यापासून माझा हेतू..
तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा? कदाचित आता तुम्ही हे सर्व भारत सरकारची दिशाभूल करण्यासाठीही सांगत असाल...
नाही, तसे मुळीच नाही. मी तसे का करीन? मी भारतीय आहे! भारताशी मी तसे कसे करीन?
तसे आहे तर तुमच्याकडे दोन पासपोर्ट कसे?
कारण त्यांनी माझ्यासाठी पासपोर्ट तयार केले...
पण तुम्ही करू दिलेत, तुम्ही दोन पासपोर्ट घेणे मान्य केलेत म्हणून.. त्यांनी जबरदस्तीने तर माथी नाही मारले?
नाही. त्यांनी ते बळजबरीने माझ्यावर लादले.. त्यांनी माझा पासपोर्ट काढून घेऊन मला कुटुंबासह बळजबरीने बँकॉकला पाठविले... बंदूकधारी लोक सोबत देऊन तुम्हाला एखादी गोष्ट करायला लावली जाते तेव्हा त्यास विरोध करणे खूप कठीण असते...
पण, हे लोकांना पटायला हवे ना?
या क्षणाला यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, हे मलाही कळते. पण लोकांना हे नक्की पटेल, कारण सत्य हे सत्यच असते... मला याची पक्की खात्री आहे.
बरं, आता तुमच्या मते वस्तुस्थिती काय आहे ते पाहू या.. तुमच्याकडे दोन पासपोर्ट होते व ते तुम्हाला जबरदस्तीने दिले गेले असे तुम्ही म्हणता.. आयडेन्टिटी कार्ड, स्कूल लीव्हिंग सर्टिर्फिकेट... तेही तुमच्यावर लादण्यात आले, असे तुम्हाला म्हणायचे आहे?
हो नक्कीच. सर्वकाही जबरदस्तीने माझ्यावर लादण्यात आले. मी हे सर्व मान्य केले; कारण मी आता त्यांच्यासाठी धोका नाही असे मला त्यांना भासवून द्यायचे होते.. त्यांच्याकडून माहिती मिळविण्यासाठी तसे करणे गरजेचे होते व माझ्यापुढे तो एकच मार्ग होता...
असा बळजबरीने लादलेला ऐशआराम उपभोगणे प्रत्येकालाच आवडेल हो, पण एवढे मात्र नक्की की या तुमच्या म्हणण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही! हे तुम्ही सर्व सांगताहात ते सर्वस्वी असंभव आहे... तुम्ही हे सांगावे आणि तुम्ही निरपराध आहात यावर लोकांनी विश्वास ठेवावा अशी तुमची अपेक्षा आहे?
माझी लोकांकडून कसलीच अपेक्षा नाही. मला लोकांपुढे फक्त सत्य मांडायचे आहे. निर्णय त्यांचा त्यांनी करू द्या.
आणि तुम्ही सांगताय ती वस्तुस्थिती अशी की, तुम्ही तेथे दुहेरी ओळख असलेले आयुष्य जगत होतात, मार्चपासून त्यांचा पाहुणचार घेत होतात..
मी हे जे सांगतोय ते हिमनगाचे केवळ टोक आहे.. लोकांपुढे सर्व सत्य येऊ द्या व त्यांना ठरवू द्या...
आता आपण पुन्हा पहिल्या प्रश्नाकडे परत वळू या. असे होते तर तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या मातृभूमीत तेव्हाच परत येऊन आपल्या भावाविरुद्ध का माहिती दिली नाही?
पहिल्या दिवसापासून आम्हाला घरात कोंडले गेले होते... स्वचलित शस्त्रधारी तीन-चार गार्डचा आमच्यावर पहारा होता...
घरात कोंडून ठेवले होते तरी तुम्ही धंदा मात्र यशस्वीपणे करत होतात...
ते नंतर...
बरं मग, नंतर तरी तुम्ही का परत आला नाही?
परत यायची हीच योग्य वेळ आहे (असे मला वाटले) आणि म्हणून मी (आत्ता) आलो आहे...
किती काळ तुम्ही तिकडे होतात? गेल्या मार्चपासून...
१० वर्षे लागली असती तरी मी थांबलो असतो व त्यानंतर हेच केले असते.....
पण तिकडे तर तुमचे आयुष्य मजेत चालले होते की..?
नाही मी तिकडे मजेत नव्हतो. मला जर तसे राहणे आवडले असते तर मी परत आलोच असतो कशाला? स्वत:हून कशाला आलो असतो?
तुम्ही म्हणता तुमच्या भावाशी तुमचा काही संबंध नव्हता. तुम्ही त्याच्याशी रोज तासभर बोलायचात...
नाही, रोज नाही. संपूर्ण आयुष्यात क्वचित कधी मी त्याच्याशी १ तास बोललो असेन, असे मी म्हटले होते.
एका घरात एकत्र राहूनही? आणि लोकांंनी यावर विश्वास ठेवावा, असे तुम्हाला वाटते?
हो. लोक नक्की विश्वास ठेवतील. शेवटी सत्य हे सत्यच असते.
विश्वास ठेवण्यासारखे असेल तर लोक विश्वास ठेवतील. थापेबाजीवर नाही...
नाही, ही थापेबाजी नाही. जे आमच्या शेजारी राहायचे त्यांना विचारा, तेही तुम्हाला हेच सांगतील.
ठीक आहे. आता आपण पुन्हा मूळ प्रश्नाकडे वळू या. बॉम्बस्फोटांमागे तुमचा भाऊ आहे, हे १७ मार्चला कळले तेव्हा...
१७ मार्च नाही २० मार्च, जेव्हा आम्ही कराचीला पोहोचलो..
बरं. २० मार्च. मग तेव्हा हे कळल्यावर तुम्ही लगेच का नाही (भारतात) परत आलात?
हे पाहा, ते शक्य नव्हते, हे मी आधीही सांगितले आहे. त्या वेळेची परिस्थितीच अशी होती... आम्हाला घरात कोंडून ठेवले गेले होते...
बरं मग, टायगरने हे सर्व का केले असावे, असे आपल्याला वाटते?
पाकने मनात विष भरवून दिल्याने... जानेवारीतील दंगलींमुळे... जानेवारीच्या दंगलींत मुसलमानांना ठरवून लक्ष्य केले गेले... निरपराध लोकांचा...
मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारू का, की टायगरने जे काही केले ते त्याने का बरे केले?
मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेन...
टायगर मेमनने बॉम्बस्फोटांचे हे कारस्थान रचण्याचे कारण काय?
जानेवारीतील दंगलींचा सूड घेण्यासाठी...
आणि पाकिस्तान सरकारचे काय? त्यांनी या सर्वाला मदत करण्याचे कारण काय?
पाकिस्तानने त्यांना हवे तेच केले..
त्यांनी मेमन कुटुंबाच्या बाबतीत याचा अंदाज बांधला की...
(नाही) एकूणच मुस्लीम समाजाविषयी...
मग, त्यांनी टायगरशी संपर्क साधला?
हो. हो.. हो.. त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला...
तसाच तुमच्याशीही त्यांनी संपर्क साधला?
नाही, कधीच नाही!
म्हणजे? पाकिस्तानला काय हवे होते?
पाकिस्तानला भारतात गडबड व्हायला हवी होती... ज्याने भारताला हानी पोहोचेल... ज्याने येथील लोकांचे, मग ते हिंदू असोत वा मुसलमान, नुकसान करायचे हाच त्यांचा हेतू होता.. कोणाला झळ पोहोचते याचे त्यांना काही देणेघेणे नाही... फक्त भारतात गडबड, गोंधळ माजवायचा हाच त्यांचा हेतू होता... त्यासाठी पोषक परिस्थिती त्यांना दिसली. जानेवारीच्या दंगलींमुळे भारतातील मुसलमान मनातून दुखावले गेले आहेत हे ताडले.
तुम्ही कोणत्या परिस्थितीत मुंबई सोडून गेलात, ते जरा सांगा...
हे पाहा, मी ११ मार्चला मुंबईहून गेलो. मार्चच्या पहिल्या आठवड्यात टायगरनं सांगितलं की, परिस्थिती काही चांगली नाही. इथं खूप टेन्शन आहे.. आणि तुम्हाला सांगतो की, खासकरून जानेवारीतील दंगलींनंतर खरंच वातावरण चांगलं नव्हतं.
कोंडून ठेवलं होतं तरी तुमचं सर्वकाही व्यवस्थित सुरू होतं... तुम्ही व्यवसाय
करीत होतात... लोकांच्या भेटीगाठी घेत होतात... लग्न समारंभांना जात होतात....
नाही, मी त्या वेळी तेथील लोकांमध्ये कधीच मिसळलो नाही... मी फक्त माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करीत होतो... मी फक्त तौफिकच्या घरी जायचो... तेसुद्धा हवी असलेली माहिती मिळावी या हेतूने... आणि त्याही वेळी मला वाटायचे की ते लोक आमच्यावर
पाळत ठेवत
आहेत.
बॉम्बस्फोटांमध्ये आपला भाऊ गुंतलेला आहे, हे तुम्हाला नेमके केव्हा समजले?
कराचीला पोहोचल्यावर...
तेथे मी टायगरशी सविस्तर चर्चा केली व आम्हाला सर्वांना का बोलावून घेतले याचा त्याच्याकडून खुलासा करून घेतला... तेव्हा त्याने सर्व सांगितले.
ही नेमकी केव्हाची गोष्ट आहे?
साधारण २० मार्चच्या आसपासची. आम्ही तौफिक जालियाँवालाच्या बंगल्यात राहात होतो तेव्हाची...
म्हणजे, स्फोटांनंतर १० दिवसांनी...
हो, स्फोटांनंतर सुमारे १० दिवसांनी.
स्फोटांनंतर १० दिवसांनी तुम्हाला सर्व समजले तर तुम्ही त्याच वेळी लगेच भारतात का परत आला नाही?
ते शक्य नव्हते...
का नाही..?
मग, तुमचा देशाभिमान कुठे गेला होता? तुमची तेथे ऐशआरामात राहण्याची सोय केली गेली... तो सर्व पाहुणचार तुम्ही घेतलात.. आता म्हणता की, ते सर्वकाही तुमच्यावर जबरदस्तीने लादण्यात आले...?का नाही..?
मग, तुमचा देशाभिमान कुठे गेला होता? तुमची तेथे ऐशआरामात राहण्याची सोय केली गेली... तो सर्व पाहुणचार तुम्ही घेतलात.. आता म्हणता की, ते सर्वकाही तुमच्यावर जबरदस्तीने लादण्यात आले...?