पीपल्स बँक बिनविरोधची ८३ वर्षांची परंपरा निवडणूक : १४ जागांसाठी होत आहे मतदान
By admin | Published: March 22, 2016 12:39 AM2016-03-22T00:39:40+5:302016-03-22T00:39:40+5:30
जळगाव : जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून १४ जागांसाठी १० एप्रिल रोजी मतदान होत आहे. बँकेच्या स्थापनेपासून म्हणजे १९३३ पासून संचालक मंडळ बिनविरोध निवडीची परंपरा आहे. या निवडणुकीतदेखील बिनविरोध निवडीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत.
Next
ज गाव : जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून १४ जागांसाठी १० एप्रिल रोजी मतदान होत आहे. बँकेच्या स्थापनेपासून म्हणजे १९३३ पासून संचालक मंडळ बिनविरोध निवडीची परंपरा आहे. या निवडणुकीतदेखील बिनविरोध निवडीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. असा आहे निवडणूक कार्यक्रम२०१६-२०२१ या पाच वर्षांसाठी संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. १९ मार्च पासून नामनिर्देशन अर्ज विक्री व अर्जांची स्विकृती सुरू झाली असून २२ मार्च पर्यंत सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत बँकेच्या सभागृहात अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. २३ मार्च रोजी अर्जांची छाननी होऊन त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता छाननी झालेल्या अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २८ ते ३१ मार्च दरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत अर्ज मागे घेता येतील. १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १० एप्रिल रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी पाच या वेळेत नेरी नाक्या नजीक यशवंतराव पाटील मुक्तांगण सभागृहात मतदान होणार आहे. याच ठिकाणी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून मतमोजणी होऊन मतमोजणी नंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येईल.१४ जागांसाठी होणार निवडणूक जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची १४ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात मनपा क्षेत्रातील १२ जागा तर मनपा क्षेत्राबाहेरील दोन जागांचा समावेश आहे. मनपा क्षेत्रात ९ जागा जनरल उमेदवारांसाठी आहे. एक जागा अनु.जाती व जमातीसाठी आहे. दोन जागा महिला राखीवसाठी आहे. मनपा क्षेत्राबाहेरील मात्र जिल्ातील एक जागेसाठी तर जळगाव जिल्ाबाहेरील एका जागेसाठी निवडणूक होत आहे.बँकेच्या स्थापनेपासून बिनविरोधची परंपरा जळगाव पीपल्स सहकारी बँकेची स्थापना ही १९३३ मध्ये झाली. यावेळी सोसायटीचा दर्जा देण्यात आला होता. संस्थापक संचालक रामदास लहानू पाटील यांची त्यावेळी बिनविरोध निवडीची परंपरा सुरु केली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने १९८४ मध्ये बँकिंग लायसन्स परवाना पीपल्स बँकेला प्रदान केला. पारदर्शकता, उत्कृष्ट सेवा याच्या बळावर बँकेने आजही आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.