पीपल्स बँक संचालक निवडणूक बिनविरोध चौघांची माघार : अधिकृत घोषणा होणार ३१ मार्च रोजी
By admin | Published: March 29, 2016 12:24 AM2016-03-29T00:24:38+5:302016-03-29T00:24:38+5:30
जळगाव : जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. उमेवारी अर्ज माघारीच्या दिवशी चार जणांनी माघार घेतल्याने १४ जागांसाठी १४ उमेदवारी अर्ज राहिल्याने संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा ३१ मार्च रोजी होणार आहे.
Next
ज गाव : जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. उमेवारी अर्ज माघारीच्या दिवशी चार जणांनी माघार घेतल्याने १४ जागांसाठी १४ उमेदवारी अर्ज राहिल्याने संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा ३१ मार्च रोजी होणार आहे.जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. जळगाव जिल्ाबाहेरील मात्र बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या सर्वसाधारण गटातून सुहास बाबूराव महाजन यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. १३ जागांसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.चौघांनी घेतली माघारपीपल्स बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी सोमवार २८ पासून माघार घेण्यास सुरुवात होणार होती. त्यानुसार अत्तरदे दिलीप नथू, पाटील निमिष भालचंद्र, झांबरे शिरीष गणपत, सराफ ज्योती प्रकाश या चार उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता १४ जागांसाठी १४ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र माघारीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत असल्याने बिनविरोधची अधिकृत घोषणा त्याच दिवशी होणार आहे.नव्या संचालक मंडळात यांचा समावेश१४ जागांसाठी १४ उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. त्यात विद्यमान अध्यक्ष भालचंद्र प्रभाकर पाटील, प्रकाश मांगीलाल कोठारी, दत्तात्रय नथू चौधरी, चंद्रकांत बळीराम चौधरी, सुनील प्रभाकर पाटील, दुर्गादास दत्तात्रय नेवे, रामेश्वर आनंदराम जाखेटे, अनिकेत भालचंद्र पाटील, चंदन सुधाकर अत्तरदे, विलास चुडामण बोरोले, सुरेखा विलास चौधरी, स्मिता प्रकाश पाटील, राजेश धीरजलाल परमार, सुहास बाबूराव महाजन यांचा नव्या संचालक मंडळात समावेश राहणार आहे.