पंतप्रधान कार्यालयाने १५ मिनिटात घेतली पीपल्स बँकेच्या तक्रारीची दखल

By admin | Published: September 23, 2016 11:00 PM2016-09-23T23:00:03+5:302016-09-23T23:00:03+5:30

जळगाव : दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेने डीआरटी कोर्टासंदर्भात एक तक्रार वजा विनंती अर्ज २० सप्टेंबर रोजी दुपारी २.४० मिनिटांनी मेलद्वारे पीएमओकडे दाखल केला होता. त्याला लागलीच म्हणजे अवघ्या १५ मिनिटात उत्तर येऊन कारवाई करण्याविषयी त्यांनी बँकेला आश्वासीत केले आहे. पीएमओंच्या या कार्यतत्परतेने बँकेतील सर्वांना आ›र्याचा धक्का बसला असून आपल्याकडील सरकारी यंत्रणांकरिता हा एक आदर्श निर्णय ठरला आहे.

The People's Bank's complaint took place within 15 minutes of the Prime Minister's Office | पंतप्रधान कार्यालयाने १५ मिनिटात घेतली पीपल्स बँकेच्या तक्रारीची दखल

पंतप्रधान कार्यालयाने १५ मिनिटात घेतली पीपल्स बँकेच्या तक्रारीची दखल

Next
गाव : दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेने डीआरटी कोर्टासंदर्भात एक तक्रार वजा विनंती अर्ज २० सप्टेंबर रोजी दुपारी २.४० मिनिटांनी मेलद्वारे पीएमओकडे दाखल केला होता. त्याला लागलीच म्हणजे अवघ्या १५ मिनिटात उत्तर येऊन कारवाई करण्याविषयी त्यांनी बँकेला आश्वासीत केले आहे. पीएमओंच्या या कार्यतत्परतेने बँकेतील सर्वांना आ›र्याचा धक्का बसला असून आपल्याकडील सरकारी यंत्रणांकरिता हा एक आदर्श निर्णय ठरला आहे.
सध्या महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागूर आणि औरंगाबाद येथे डीआरटी कोर्ट आहेत. या चार डीआरटी कोर्टापैकी नागपूर आणि औरंगाबाद येथे गेल्या अडीच वर्षांपासून सक्षम अधिकारी नसल्यामुळे येथील बँकांच्या आर्थिक वसुलीबाबतच्या सर्व केसेस ‘ा मुंबई येथील डीआरटी कोर्टात वर्ग करण्यात आलेल्या आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार मुंबईलाही सक्षम अधिकारी त्या पदावर नसल्यामुळे या सर्व केसेस तात्पुरत्या स्वरूपात कलकत्ता येथे वर्ग करण्यात आलेल्या आहेत. या माहितीचा आधार घेत अनेक कर्जदार कर्जाची परतफेड न करता डीआरटी कोर्टात अपीलेट ऑथरीटीकडे अर्ज दाखल करतात आणि प्रकरण न्याय प्रविष्ठ करून देय रक्कम प्रलंबित करतात. यामुळे मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद कक्षेत येणार्‍या सहकारी, शेड्युल, राष्ट्रीयकृत बँकांची हजारो दाव्यांची हजारो कोटी रुपयांची प्रकरणे प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. कर्जदारांची प्रकरण प्रलंबित करण्याची ही वृत्ती ओळखून दि जळगाव पीपल्स् को-ऑप. बँकेने तक्रार अर्जाद्वारे पीएमओमध्ये वस्तूस्थिती मांडली. त्यामध्ये सक्षम अधिकारी नियुक्त करण्याविषयी तसेच अनेक प्रलंबित केसेस या तातडीने सुनावणी होऊन निकाल लागण्याविषयी पंतप्रधानांना विनंती केली. त्या विनंतीची दखल पीएमओने तत्काळ घेत अवघ्या १५ मिनिटात पुढील कारवाईला सुरुवात झाल्याचे दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेला कळविले आहे. या घटनेमुळे येणार्‍या जवळच्या काळात अनेक केसेस् निकाली लागून बँकांना व कर्जदारांना योग्य तो न्याय मिळेल अशी आशा बँकेचे सीईओ अनिल पाटकर यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The People's Bank's complaint took place within 15 minutes of the Prime Minister's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.