पेप्सी, कोकवरील पाणीबंदी कोर्टाने उठविली

By admin | Published: March 3, 2017 04:23 AM2017-03-03T04:23:46+5:302017-03-03T04:23:46+5:30

मदुराई खंडपीठाने पेप्सी आणि आणि कोका कोला या कंपन्यांना थामीरबराणी नदीतून पाणी घेण्यास बंदी घालण्यास नकार दिला

Pepsi, coke wake up the court | पेप्सी, कोकवरील पाणीबंदी कोर्टाने उठविली

पेप्सी, कोकवरील पाणीबंदी कोर्टाने उठविली

Next


नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने पेप्सी आणि आणि कोका कोला या कंपन्यांना थामीरबराणी नदीतून पाणी घेण्यास बंदी घालण्यास नकार दिला असून, यासंबंधीच्या दोन याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. तसेच आधीची अंशत: पाणीबंदीही उठविण्यात आली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कोका कोला आणि पेप्सी यांच्यासह काही कंपन्यांना नदीतून पाणी घेण्यास न्यायालयाने अंशत: मर्यादा घातली होती. या प्रकरणी दोन जणांनी याचिका दाखल करून या कंपन्यांना पाणी उचलण्यास पूर्ण बंदी घालण्याची विनंती केली होती. या नदीतून इतरही अनेक कंपन्या पाणी उचलीत आहेत. मात्र, याचिकेत केवळ आपल्यालाच टार्गेट करण्यात आल्याचे दोन्ही कंपन्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. नदीत पुरेसे पाणी असून, कंपन्यांना अतिरिक्त पाणी पुरविले जात असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Pepsi, coke wake up the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.