यूपी विधानसभेत वाढला महिला आमदारांचा टक्का

By admin | Published: March 14, 2017 03:13 PM2017-03-14T15:13:38+5:302017-03-14T16:30:30+5:30

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने मिळवलेला बंपर विजय सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. 403 सदस्य असलेल्या यूपी विधानसभेत 325 जागा

The percentage of women MLAs increased in UP Assembly | यूपी विधानसभेत वाढला महिला आमदारांचा टक्का

यूपी विधानसभेत वाढला महिला आमदारांचा टक्का

Next
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 14 - उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने मिळवलेला बंपर विजय सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. 403 सदस्य असलेल्या यूपी विधानसभेत 325 जागा जिंकत भाजपा आणि मित्रपक्षांनी विक्रम घडवला आहे. त्याबरोबरच यंदाच्या यूपी विधानसभेत अजून एक विक्रम नोंदवला गेला आहे. यंदा उत्तर प्रदेश विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार निवडून आल्या आहेत. सर्वपक्षांच्या मिळून 38 महिला आमदार उत्तर प्रदेशच्या विधानसभेत पोहोचल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या इतिहासात महिला आमदारांच्या प्रतिनिधित्वाचा हा आकडा सर्वाधिक आहे. 
निवडणूक जिंकण्याची क्षमता या निकषावर सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवारांना प्राथमिकता देण्यात आली. त्यामुळे आघाडीच्या सर्व पक्षांकडून मिळून केवळ 96 महिला उमेदवारांनाच उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी 38 महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपाने निवडणुकीत 43 महिलांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी 32 जणी विजयी झाल्या आहेत. तर काँग्रेस आणि बसपाच्या प्रत्येकी दोन आणि सपा व अपना दल (सोनेलाल) यांच्या प्रत्येकी एक महिला आमदार विधानसभेत पोहोचल्या आहेत.
1952 साली झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधून 20 महिला आमदार विधानसभेत पोहोचल्या होत्या. त्यानंतर हा आकडा सातत्याने वरखाली होत राहिला.  गेल्या विधानसभा निवडणुकीत 2012 साली  35 महिला आमदार निवडून आल्या होत्या. त्याआधी 2007 साली 23 तर 2002 साली 26 महिला आमदार उत्तर प्रदेशच्या  विधानसभेत पोहोचल्या होत्या.  
 

Web Title: The percentage of women MLAs increased in UP Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.