आणखी १० दिवसांनी वाढवली जुन्या नोटा वापरण्याची मुदत
By admin | Published: November 14, 2016 08:20 AM2016-11-14T08:20:08+5:302016-11-14T08:31:12+5:30
५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटांसंबंधी केंद्र सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत आज मध्यरात्री संपणार होती. पण चलन तुटवडयामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने जुन्या नोटा वापरण्याची मुदत आणखी १० दिवसांनी वाढवली आहे.
मंगळवारी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला पण त्यावेळी काही अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते. जिथे जुन्या नोटा वापरता येणार होत्या. ही मुदत आणखी १० दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
सरकारने या जुन्या नोटांची वैधता आणखी १० दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे रुग्णालय, पेट्रोल पंप, टोलनाके आणि रेल्वे स्टेशनवर २४ नोव्हेंबरपर्यंत ५०० आणि १ हजार रुपयाच्या जुन्या नोटा वापरता येतील. रविवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठकीत नोटबंदीच्या निर्णयाचा आढावा घेतला त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
आर्थिकविषयाचे सचिव शशिकांत दास यांनी रुग्णालय, पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा वापरण्याची मुदत २४ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती दिली.
Currently govt has given exemption to certain category of transactions where old series of 500 & 1000 notes can be accepted:Shaktikanta Das
— ANI (@ANI_news) 13 November 2016
The limit for such transactions is being extended from 14th November midnight to 24th November midnight: Shaktikanta Das
— ANI (@ANI_news) 13 November 2016