परवानगी मिळाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं ध्वजारोहण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 09:06 AM2017-08-15T09:06:04+5:302017-08-15T10:46:11+5:30
सरसंघचालक मोहन भागवत यांना झेंडावंदन करण्यास नाकारण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
तिरुअनंतपुरम, दि. 15 - ध्वजारोहणापासून रोखलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखेर केरळमध्ये ध्वजारोहण केले.
केरळच्या पलक्कडमध्ये एका शाळेमध्ये ध्वजारोहणासाठी मोहन भागवतांना आमंत्रण देण्यात आले होते. पण एखादा राजकीय नेता शाळेमध्ये ध्वजवंदन करु शकत नाही, असा आक्षेप स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे मोहन भागवत यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखण्यात आले होते.
मात्र त्यानंतर शाळा प्रशासनाने मध्यस्थी केली व मोहन भागवतांना आपण आमंत्रण दिल्याचे सांगितले. व मोहन भागवत यांना झेंडावंदनाची परवानगी देण्याची मागणी केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला मोहन भागव यांना झेंडावंदन करण्याची परवानगी दिली.
Kerala: RSS Chief Mohan Bhagwat has now unfurled the national flag in Palakkad school
— ANI (@ANI) August 15, 2017
Kerala: RSS Chief Mohan Bhagwat unfurled the national flag in Palakkad school pic.twitter.com/vDK8xn9V20
— ANI (@ANI) August 15, 2017