Video: पाकमधून आलेल्या विमानास परत उड्डाणाची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 06:47 AM2019-05-11T06:47:01+5:302019-05-11T08:25:45+5:30
पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून मालवाहतूक करणारे विमान शुक्रवारी भारतीय हद्दीत आल्याने सतर्क हवाई दलाने त्या विमानाला जयपूर विमानतळावर उतरण्यास भाग पाडले. हे विमान जॉर्जियाचे असून, ते कराचीहून निघाल्यावर भारतीय हद्दीत आले होते.
नवी दिल्ली : पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून मालवाहतूक करणारे विमान शुक्रवारी भारतीय हद्दीत आल्याने सतर्क हवाई दलाने त्या विमानाला जयपूर विमानतळावर उतरण्यास भाग पाडले. हे विमान जॉर्जियाचे असून, ते कराचीहून निघाल्यावर भारतीय हद्दीत आले होते.
जयपूरला विमान उतरविल्यानंतर त्यातील वैमानिक व कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली. विमानाचीही तपासणी झाली. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीअंती ते चुकून भारतीय हद्दीत आल्याचे स्पष्ट झाले. हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यात काहीही संशयास्पद आढळून आले नाही. त्या विमानाला पुन्हा उड्डाण करण्याची त्यामुळे परवानगी देण्यात आली आहे.
#WATCH: Indian Air Force fighter jets force an Antonov AN-12 heavy cargo plane coming from Pakistani Air space to land at Jaipur airport. Questioning of pilots on. pic.twitter.com/esuGbtu9Tl
— ANI (@ANI) May 10, 2019