केजरीवालांच्या जनता दरबारातून एकाला अटक, जिवंत काडतूस सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 11:37 AM2018-11-27T11:37:05+5:302018-11-27T11:41:04+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जनता दरबारातून एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या संशयिताकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

a person caught with live bullets in arvind kejriwals janta darbar | केजरीवालांच्या जनता दरबारातून एकाला अटक, जिवंत काडतूस सापडल्याने खळबळ

केजरीवालांच्या जनता दरबारातून एकाला अटक, जिवंत काडतूस सापडल्याने खळबळ

Next
ठळक मुद्देअरविंद केजरीवाल यांच्या जनता दरबारातून एका संशयित व्यक्तीला अटकपिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने एकच खळबळमोहम्मद इमरान (38) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जनता दरबारातून एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या संशयिताकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इमरान (38) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर आयोजित जनता दरबार कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मोहम्मद इमरान आला होता. त्यावेळी तपासणीदरम्यान त्याच्या खिशात पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडले. त्यानंतर त्याला पोलिसांनी लगेच आपल्या ताब्यात घेतले.

मोहम्मद इमरान हा सीलमपूर येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यासोबत 12 अन्य इमाम आणि मौलवी हे देखील होते. हे सर्व दिल्ली वक्फ बोर्डमधील कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी अशी शिफारस करण्यासाठी जनता दरबारात आल्याची माहिती मिळत आहे. 

दरम्यान, मोहम्मद इमरान यांच्याकडे जिवंत काडतूस सापडल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. याआधी गेल्या आठवड्यात अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने मिरची पूड फेकल्याची घटना घडली होती.  
 

Web Title: a person caught with live bullets in arvind kejriwals janta darbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.