'हा' व्यक्ती शेतकऱ्यांच्या जेवणावर दररोज खर्च करायचा 4 लाख रुपये, वर्षभर चालवला लंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 05:41 PM2021-12-13T17:41:56+5:302021-12-13T17:44:01+5:30
तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी वर्षभराहून अधिक काळ आंदोलन करत होते. आंदोलनादरम्यान त्यांच्यासाठी लंगरची सोय करण्यात आली होती.
नवी दिल्ली :दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता मागे घेण्यात आले आहे. आंदोलक शेतकरी आपापल्या घराकडेही निघाले आहेत. अशा परिस्थितीत सिंघू सीमेवर शेतकऱ्यांसाठी वर्षभर लंगर चालवणारा हॉटेलचा मालक सध्या चर्चेत आहे. आंदोलनादरम्यान त्यांनी हजारो शेतकऱ्यांना मोफत जेवण दिले. आंदोलनाच्या शेवटी संयुक्त किसान मोर्चाने (SKM) पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आभारही मानले.
दिल्ली: सिंघू बॉर्डर पर गोल्डन हट रेस्टोरेंट के मालिक पिछले एक साल से मुफ्त लंगर चला रहे हैं।
— ANI_HindiNews (@AHindinews) December 11, 2021
गोल्डन हट के मालिक राम सिंह राणा ने कहा, "हर एक किसान हमारा परिवार है। ये लंगर तब तक चलेगा जब तक की हर एक किसान अपने घर नहीं चला जाता।" pic.twitter.com/lAnL19QZPm
रेस्टॉरंटचे नाव गोल्डन हट आहे. गोल्डन हटचे मालक राणा रामपाल सिंग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मी खूप आनंदी आहे. आनंदाचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. शेतकरी हे माझे कुटुंब आहे. प्रत्येक शेतकरी त्याच्या घरी जाईपर्यंत हा लंगर चालेल. राणा रामपाल सिंह दररोज सुमारे 4 लाख रुपये खर्च करुन शेतकऱ्यांसाठी लंगर चालवत होते. शेतकरी आंदोलनादरम्यान रेस्टॉरंट इतरांसाठी बंद ठेवण्यात आले होते. आता आंदोलन संपले आहे, त्यामुळे ते पुन्हा आपले रेस्टॉरंट उघडण्याच्या तयारीत आहे.
शेतकरी आंदोलन मागे
गेल्या एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत होते. आंदोलन मागे घेतल्याच्या पहिल्याच दिवशी बहुतांश शेतकरी दिल्लीच्या सीमा सोडून आपापल्या घरी परतले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कृषीविषयक कायदे रद्द करण्यासाठी आवश्यक विधेयक केंद्र सरकार आणेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी केली होती. त्यानुसार, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 29 नोव्हेंबर रोजी लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक मांडण्यात आले आणि ते मंजुर झाले केले.