पेसुना धार्मिक तेढ निर्माण करीत आहेत सीसीटीव्ही काढा : रहिवाशांनी दिला लोकशाहीदिनात अर्ज
By admin | Published: April 5, 2016 12:13 AM2016-04-05T00:13:54+5:302016-04-05T00:13:54+5:30
जळगाव : रुस्तमजी एज्युकेशनल ट्रस्ट, मेहरुण सर्वे नं.४३७/१-४३८/२ ब या खुल्या भूखंडामध्ये असलेल्या गणपती मंदिरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेर्यांचे नियंत्रण हे मंदिरात ठेवण्यात यावे तसेच मंदिर परिसरातील सुरक्षा रक्षक काढून घेण्यात यावा या आशयाची तक्रार स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे लोकशाही दिनात दिली.
Next
ज गाव : रुस्तमजी एज्युकेशनल ट्रस्ट, मेहरुण सर्वे नं.४३७/१-४३८/२ ब या खुल्या भूखंडामध्ये असलेल्या गणपती मंदिरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेर्यांचे नियंत्रण हे मंदिरात ठेवण्यात यावे तसेच मंदिर परिसरातील सुरक्षा रक्षक काढून घेण्यात यावा या आशयाची तक्रार स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे लोकशाही दिनात दिली.मंदिरात धार्मिक सलोख्याचे वातावरण असताना विराफ पेसुना, भुर्जीन पेसुना, नितीन परिकर यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही फुटेज लावले आहेत. तसेच या कॅमेर्यांचे नियंत्रण हे पेसुना यांनी आपल्या कॅबिनमध्ये ठेवले आहे. या सीसीटीव्ही फुटेजचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. मंदिर परिसरात २७ मार्च रोजी पेसुना यांनी खाजगी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली आहे. हा सुरक्षा रक्षक मंदिर परिसरात चपला वापरत असल्याचा आरोप केला आहे.तक्रार अर्जावर मधु भाटिया, ॲड.किरण शिरसाठे, राजेंद्र पाटील, एस.एम.साठे, विमला कुलकर्णी, के.के.जोशी यांच्यासह रहिवाशांच्या सा आहेत.