अमित शाह यांच्या विरोधातील याचिका फेटाळली

By admin | Published: August 2, 2016 04:41 AM2016-08-02T04:41:37+5:302016-08-02T04:41:37+5:30

अमित शाह यांना निर्दोष सोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.

A petition against Amit Shah rejected | अमित शाह यांच्या विरोधातील याचिका फेटाळली

अमित शाह यांच्या विरोधातील याचिका फेटाळली

Next


नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना निर्दोष सोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. या प्रकरणात याचिकाकर्ते माजी नोकरशहा हर्ष मांदेर यांचा अधिकार काय, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला.
न्यायमुर्ती एस. ए. बोबडे आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने अर्धा तास घेतलेल्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने शाह यांना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी मांदेर यांची याचिका फेटाळली. खालच्या न्यायालयाचा शाह यांना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय उच्च न्यायालयानेही योग्य ठरविला होता. खटल्यामध्ये खरोखर अन्याय झाला असेल, तर व्यक्तीने दाद मागितली तर ती परिस्थिती विचारात घेण्यासारखी असते, परंतु प्रकरणाशी दुरूनही संबंध नसताना व प्रकरण पुन्हा जिवंत करण्याचा त्याचा प्रयत्न असताना वेगळी स्थिती निर्माण होते, असे खंडपीठाने म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: A petition against Amit Shah rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.