भगवान रामाविरुद्धची याचिका फेटाळली

By admin | Published: February 1, 2016 08:29 PM2016-02-01T20:29:22+5:302016-02-01T20:32:31+5:30

एका धोब्याच्या म्हणण्यावरून सीतेचा त्याग करणाऱ्या भगवान श्रीरामचंद्रांविरुद्ध बिहारच्या सीतामढी न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाऴून लावली आहे.

The petition against Lord Rama rejected | भगवान रामाविरुद्धची याचिका फेटाळली

भगवान रामाविरुद्धची याचिका फेटाळली

Next
>ऑनलाइन लोकमत
पटना, दि. १ - एका धोब्याच्या म्हणण्यावरून सीतेचा त्याग करणाऱ्या भगवान श्रीरामचंद्रांविरुद्ध बिहारच्या सीतामढी न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाऴून लावली आहे. 
सरकारी वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणावर सुनानणी करताना न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले की प्राचिन काळात या घटनेसाठी कुणाला शिक्षा करण्यात यावी?  याप्रकरणी साक्षीदार कोण होणार?  तसेच, याचिकेत असा उल्लेख सुद्धा करण्यात आला नाही की, भगवान श्रीरामचंद्रने सीताला कोणत्या दिवशी किंवा तारखेला घराबाहेर काढले आणि दाखल करण्यात आलेली याचिका कोणत्या आधारावर आहे, असा सवाल करत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. 
सीतामढीच्या डुमरी कला गावातील रहिवासी असलेले ठाकूर चंदन सिंह यांनी शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. एका धोब्याच्या सांगण्यावरून भगवान रामचद्रांनी सीतेचा त्याग केला.  लक्ष्मणानेही याकामी भगवान रामचंद्रांची साथ दिली. सीतेची कुठलीही चूक नव्हती. कुठलाही पुरुष पत्नीवर इतका मोठा अन्याय कसा करू शकतो? जी पत्नी आपन्या पतीसोबत एकनिष्ठ राहून त्याच्या सुख-दु:खात सोबत देते, तिला इतकी मोठी शिक्षा का? असे अनेक प्रश्न ठाकूर चंदन सिंह यांनी आपल्या याचिकेत उपस्थित केले होते.

Web Title: The petition against Lord Rama rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.