अयोध्या प्रकरणी याचिकांवर लवकर सुनावणी होणार नाही

By admin | Published: April 1, 2017 01:31 AM2017-04-01T01:31:55+5:302017-04-01T01:31:55+5:30

अयोध्या राम मंदिर-बाबरी मशीद खटल्यात दाखल झालेल्या काही दिवाणी याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास

The petition for Ayodhya will not be heard early | अयोध्या प्रकरणी याचिकांवर लवकर सुनावणी होणार नाही

अयोध्या प्रकरणी याचिकांवर लवकर सुनावणी होणार नाही

Next

नवी दिल्ली : अयोध्या राम मंदिर-बाबरी मशीद खटल्यात दाखल झालेल्या काही दिवाणी याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीस जे. एस. खेहार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांना सांगितले की, या सध्या सुरू असलेल्या खटल्यात तुम्ही पक्षकार आहात, असा न्यायालयाचा समज करून देण्यात आला. प्रत्यक्षात तुमचा या खटल्याशी काहीच संबंध नाही.
तुमच्या अर्जामुळे या खटल्यातील पक्षांत मध्यस्थी करण्यास पुढाकार घेतला होता, पण तुमचा इथे काहीच संबंध नाही, तुम्ही खटल्यात पक्षकार नाहीत, हे तुम्ही आम्हाला सांगितलेच नाही. वृत्तपत्रांतील बातम्यांमधून आमच्या ते ध्यानात आले, असे न्यायालयाने स्वामी यांनी स्पष्टपणे ऐकवले. असे खंडपीठाने नमूद केले. हा विषय तातडीने विचारात घेण्यासाठी आमच्याकडे आता वेळ नाही, असे न्यायालयाने स्वामी यांना स्पष्टपणे सांगितले.
त्यावर सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, उपासना करण्याच्या माझ्या मुलभूत हक्कामुळे या प्रकरणात मी आहे हे मी स्पष्ट केले होते. हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे माझ्या प्रार्थना करण्याच्या अधिकारावर परिणाम झाला आहे आणि त्यामुळे मी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. मला तेथील मालमत्तेमध्ये कोणतेही स्वारस्य नाही. त्यानंतर न्यायालयाने हा विषय जलद गतीने विचारात घेतला नाही, असे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च रोजी रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीचा वाद न्यायालयाबाहेर वाटाघाटीने सोडवावा, अशी सूचना केली होती. धार्मिक भावनांचा प्रश्न हा चर्चेद्वारे जास्त चांगल्यारित्या सोडवला जाऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण होते. सरन्यायाधीश खेहार यांनीदेखील स्वत:ही प्रसंगी मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली होती. एवढेच नव्हे, तर आपले सहकारीही वाटल्यास मदत करू शकतील, असे ते म्हणाले होते. त्यांच्याच अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणातील दोन्ही बाजुंनी हा मनस्ताप देणारा प्रश्न अर्थपूर्ण आणि गांभीर्याने वाटाघाटीद्वारे सोडवण्यासाठी ‘थोडेसे द्यावे व थोडेसे घ्यावे’ अशी भूमिका घ्यावी, असे सुचवले होते.

न्यायालयाच्या वक्तव्यामुळे निराश झालो - स्वामी
या खटल्यातील मूळ अर्जदार मोहमद हाशिम अन्सारी यांच्या मुलानेही डॉ. स्वामी यांच्या अर्जाचा विचार करू नये, त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे पत्र सर्वोच्च न्यायालयाला लिहिले आहे. या अर्जाची तातडीने सुनावणी घेण्याच्या अर्जाबाबत आपणास माहिती देणे गरजेचे होते. ती देण्यात आली नाही, असे त्यांचे म्हणणे होते.
त्याबाबत न्यायालयाबाहेर बोलताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, न्यायालयाच्या आजच्या वक्तव्यामुळे आपण निराश झालो आहोत. या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लागावा, अशी आपली इच्छा होती, पण ती आता पूर्ण होईल, असे आपणास वाटत नाही.

Web Title: The petition for Ayodhya will not be heard early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.