औरंगाबाद-उस्मानाबादची नावे बदलणार, सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 12:43 PM2024-08-02T12:43:40+5:302024-08-02T12:44:53+5:30
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराची नावे बदलण्याबाबत जीआर काढला होता.
महाराष्ट्र सरकारने काही महिन्यापूर्वी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलण्याबाबत एक निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार विरोधात आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे. यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
Uddhav Thackeray - एकतर तू राहशील नाहीतर... मग कोण राहील? वैयक्तिक राजकीय वैमनस्य कोणती पातळी गाठेल?
राज्यातील औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.
याचिकाकर्त्यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या निर्णयाला कोणतेही कायदेशीर आव्हान न दिल्याने निर्णय कायम ठेवला होता. यानंतर याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
नाव बदलणे हा सरकारचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यासाठी न्यायालयीन पुनरावलोकनाची गरज नाही. तुमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच हायकोर्टाने सविस्तर आदेश दिले आहेत. त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. यापूर्वी ८ मे रोजी उच्च न्यायालयाने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याचा राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्यास मान्यता दिली आहे.