फटाक्यांविरोधात नवजात बालकांची सुप्रीम कोर्टात याचिका

By admin | Published: September 30, 2015 10:40 AM2015-09-30T10:40:23+5:302015-09-30T10:40:23+5:30

आमच्या फुफ्फुसांचा अद्याप पूर्णपणे विकासही झालेला नाही, आता आम्ही फटाक्यांमुळे होणारे प्रदुषण सहन करु शकत नाही अशी विनवणी दिल्लीतील तीन नवजात बालकांनी सुप्रीम कोर्टात केली आहे.

Petition filed in Supreme court against infant children | फटाक्यांविरोधात नवजात बालकांची सुप्रीम कोर्टात याचिका

फटाक्यांविरोधात नवजात बालकांची सुप्रीम कोर्टात याचिका

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३० -  आमच्या फुफ्फुसांचा अद्याप पूर्णपणे विकासही झालेला नाही, आता आम्ही फटाक्यांमुळे होणारे प्रदुषण सहन करु शकत नाही अशी विनवणी दिल्लीतील तीन नवजात बालकांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. भारतात नवजात मुलांनी सुप्रीम कोर्टात याचिका करण्याची ही पहिलीच वेळ असून फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी या याचिकाकर्त्यांनी केली आहे. 
दिल्लीत राहणारा दोन व तीन महिन्याचे अर्जून गोपाल, आरव भंडारी व १४ महिन्याच्या झोया राव भासीन यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टानेही या अल्पवयीन याचिकाकर्त्यांची याचिका स्वीकारली असून याचिकाकर्त्यांच्या वतीने त्यांचे पालक कोर्टासमोर भूमिका मांडतील. दिवाळी, दसरा आणि अन्य सणासुदीच्या काळात फटाक्यांवर बंदी घालावी अशी मागणी या याचिकाकर्त्यांनी केली आहे. दिल्ली हे गेल्या काही वर्षदात जगातील सर्वाधिक प्रदुषित शहर म्हणून समोर येत असून वायूप्रदुषणामुळे पिक जाळणे, वाहन व उघड्यावर सांडपाणी सोडणे यामुळे होणारे विपरित परिणाम याचाही अभ्यास करावा अशी मागणीही याचिकेत करण्यात आले आहे.  त्यामुळे सुप्रीम कोर्टात या नवजात मुलांनी दाखल केलेल्या याचिकेची चर्चा चांगलीच रंगली आहे. 

Web Title: Petition filed in Supreme court against infant children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.