'गॉड फादर' बीअरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, हायकोर्टात याचिका
By admin | Published: July 1, 2016 07:06 PM2016-07-01T19:06:36+5:302016-07-02T00:40:11+5:30
'गॉड फादर' बीअरमुळे धार्मिक भावना दुखवाल्या जात आहेत म्हणून या बीअरच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ : 'गॉड फादर' बीअरमुळे धार्मिक भावना दुखवल्या जात आहेत म्हणून या बीअरच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. एका संघटनेनं ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत असे म्हटले आहे की, 'गॉड फादर' या शब्दामुळे धार्मिक भावना दुखवल्या जात आहेत. 'गॉड' या शब्दामुळे प्रत्येक धर्माच्या भावना दुखावल्या जातील. प्रत्येक धर्मात 'गॉड' (देव) हा सर्वशक्तिमान असतो. त्यामुळेच या बीअरचे उत्पादन, विक्री आणि पुरवठा यावर तात्काळ बंदी आणावी. दिल्लीमधील प्रत्येक अधिकृत दुकानामध्ये 'गॉड फादर' बीअरची विक्री होत आहे. त्यांना त्याची परवानगी देऊ नये आणि त्यावर तात्काळ बंदी आणावी.
उत्तर भारतात प्रसिद्ध असणाऱ्या 'गॉड फादर' बीअर विरोधातील याचिकेवर पुढील आठवड्यात हायकोर्टात सुनावणी होणार आहे.