कोवॅक्सिनचा डोस घेतलेल्यांना कोव्हिशिल्ड घ्यायला परवानगी द्यावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 04:34 PM2021-10-29T16:34:56+5:302021-10-29T16:36:08+5:30

जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेअभावी कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना देशाबाहेर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांना कोव्हिशिल्ड लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

petition in supreme court to allow covishield vaccine to those who have taken covaxin | कोवॅक्सिनचा डोस घेतलेल्यांना कोव्हिशिल्ड घ्यायला परवानगी द्यावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका

कोवॅक्सिनचा डोस घेतलेल्यांना कोव्हिशिल्ड घ्यायला परवानगी द्यावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका

Next

ज्या भारतीयांनी कोव्हॅक्सिन लसीचे डोस घेतले आहेत, त्यांना आता कोव्हिशिल्ड  लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेत आपातकालीन वापरसाठी परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेला उशीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही याचिका सादर करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेअभावी कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना देशाबाहेर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांना कोव्हिशिल्ड लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, नागरिकांनी कुठली लस घ्यावी किंवा एका लसीवर दुसरी लस घेतलेली चालेल का, हा वैद्यकीय प्रश्न असून तो कोट्यवधी नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालय काही निर्णय़ घेऊ शकणार नाही, असं वाटत असल्याचं न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी मात्र होणार असून दिवाळीनंतर सुनावणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना कोव्हिशिल्ड घेण्यासाठी परवानगी मागणाऱ्या याचिकाकर्त्यांना प्रतीक्षा करण्याचा सल्ला न्यायालयानं दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेसोबत भारत बायोटेकच्या अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. लवकरच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत संयम ठेवण्याचा सल्लाही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिला आहे.

कोव्हॅक्सिनचा डोस घेतलेल्या नागरिकांना परदेश प्रवासात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. लवकरच कोव्हॅक्सिनला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा भारत बायोटेकनं व्यक्त केली आहे.

Web Title: petition in supreme court to allow covishield vaccine to those who have taken covaxin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.