वाधवा बंधूंच्या याचिका फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 02:30 AM2020-06-27T02:30:08+5:302020-06-27T02:30:30+5:30

येस बँकप्रकरणी केलेली अटकपूर्व जामिनासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १२ मे रोजी वाधवा बंधूंचा अर्ज फेटाळल्यापासून ते तुरुंगात आहेत.

The petitions of the Wadhwa brothers were rejected | वाधवा बंधूंच्या याचिका फेटाळल्या

वाधवा बंधूंच्या याचिका फेटाळल्या

Next

नवी दिल्ली : डीएचएफएलचे धीरज आणि कपिल वाधवा यांनी येस बॅँकप्रकरणी केलेली अटकपूर्व जामिनासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १२ मे रोजी वाधवा बंधूंचा अर्ज फेटाळल्यापासून ते तुरुंगात आहेत.
न्या. एस.के. कौल आणि न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने वाधवा बंधूंतर्फे दाखल केलेल्या चार याचिकांवर हा निकाल दिला. वाधवा बंधूंतर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आपण याचिका मंजुरीसाठी आग्रह धरणार नसल्याचे खंडपीठाला सांगितले. अंमलबजावणी संचलनालयातर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, या प्रकरणात दोन्ही वाधवा बंधूंना अटक करण्यात आली असल्याने अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज चुकीचा आहे. या आधी मुंबई उच्च न्यायालयानेही वाधवा बंधूंचा अर्ज फेटाळला होता.

Web Title: The petitions of the Wadhwa brothers were rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.