IOCL ने जारी केले पेट्रोल-डिझेलचे नवीन दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 08:23 AM2021-10-12T08:23:50+5:302021-10-12T08:24:15+5:30
ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसात पेट्रोल 2.80 तर डिझेल 3.30 रुपयांनी वाढले आहे.
नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर(Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आज इंधनाच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल 104.44 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 93.18 रुपये प्रति लीटर आहे. काल पेट्रोलच्या किंमतीत 30 पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली होती.
या महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसात पेट्रोलच्या किंमतीत 2.80 रुपयांची तर डिझेलच्या किंमतीत 3.30 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलची किंमत
>>मुंबई पेट्रोल 110.41 रुपये आणि डिझेल 101.03 रुपये प्रति लीटर
>>दिल्ली पेट्रोल 104.44 रुपये आणि डिझेल 93.17 रुपये प्रति लीटर
>>चेन्नई पेट्रोल 101.79 रुपये आणि डिझेल 97.59 रुपये प्रति लीटर
>>कोलकाता पेट्रोल 105.09 रुपये आणि डिझेल 96.28 रुपये प्रति लीटर
या राज्यांमध्ये पेट्रोल 100 पेक्षा जास्त
मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे भाव 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. राज्यांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत फरक राज्य आणि केंद्राने लावलेल्या करावर आधारित असते.
तुमच्या शहरातील आजचे दर तपासा
देशातील तीन तेल कंपन्या HPCL, BPCL आणि IOC सकाळी 6 नंतर पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसेच, मोबाईल फोनवर एसएमएसद्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर एसएमएस पाठवून तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. तुम्हाला RSP