Today's Fuel Price : पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 11 पैशांनी स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 08:15 AM2018-11-15T08:15:14+5:302018-11-15T08:21:54+5:30
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 14 पैसे तर डिझेलचे दर 11 पैशांनी स्वस्त झाले आहेत.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 14 पैसे तर डिझेलचे दर 11 पैशांनी स्वस्त झाले आहेत. कपात करण्यात आलेल्या किंमतीनुसार मुंबईकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी 82.80 रुपये तर प्रति लिटर डिझेलसाठी 75.53 रुपये मोजावे लागणार आहेत.
राजधानी नवी दिल्लीतही पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे राजधानीत प्रति लिटर पेट्रोलसाठी 77.28 रुपये, तर प्रति लिटर डिझेलसाठी 72.09 रुपये मोजावे लागणार आहेत.
मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. 6 ऑक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.
Petrol and diesel prices in #Delhi today are Rs 77.28 per litre (decrease by Rs 0.15) and Rs 72.09 per litre (decrease by Rs 0.10), respectively. Petrol and diesel prices in #Mumbai are Rs 82.80 per litre (decrease by Rs 0.14) and Rs 75.53 (decrease by Rs 0.11), respectively. pic.twitter.com/32YaYizUCK
— ANI (@ANI) November 15, 2018