कच्चे तेल महागल्याने पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार

By admin | Published: October 14, 2016 01:22 AM2016-10-14T01:22:21+5:302016-10-14T01:22:21+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्या महिन्याभरात कच्च्या तेलाच्या किमती ९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात होणाऱ्या समीक्षा बैठकीत अथवा दिवाळी

Petrol and diesel prices will go up due to high oil prices | कच्चे तेल महागल्याने पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार

कच्चे तेल महागल्याने पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार

Next

- सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्या महिन्याभरात कच्च्या तेलाच्या किमती ९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात होणाऱ्या समीक्षा बैठकीत अथवा दिवाळी आणि सणासुदीचे दिवस लक्षात घेता
पुढल्या बैठकीत डिझेल व पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळेल.
इंधन किमतींच्या समीक्षेची बैठक या सप्ताहात झाली तर डिझेल व पेट्रोलच्या किमतीत किमान १ रुपया प्रतिलीटर वाढ होईल व बैठक दिवाळीनंतर झाल्यास त्यात लीटरमागे आणखी वाढ होण्याची शक्यता इंधन क्षेत्रातल्या जाणकारांनी वर्तवली
आहे. महिन्याभरात ब्रेंट क्रुड ८.९ टक्क्यांनी महागले. आॅक्टोबर महिना सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने ५0 डॉलर्स प्रतिबॅरलपेक्षा अधिक आहेत. १0 आॅक्टोबरला क्रुड तेल ५३.१४
डॉलर्स प्रति डॉलर्सवर पोहोचले
तर डब्ल्यूटीआय क्रुड तेलाच्या किमतीत किमान १0 टक्क्यांची
वाढ झाली. इंडियन क्रुड बास्केट जे
१४ ते २८ सप्टेंबरदरम्यान सरासरी ४३.९५ डॉलर्स प्रति बॅरल
होते ते तूर्त ५0 डॉलर्स प्रति बॅरलवर स्थिर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या भावामधील चढउतारामुळे इंधनाच्या किमती लवकरच वाढतील, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

Web Title: Petrol and diesel prices will go up due to high oil prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.