पेट्रोल अन् डिझेल लवकरच शंभरी गाठणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 06:27 AM2020-06-27T06:27:22+5:302020-06-27T06:27:56+5:30

दिल्लीमध्ये आता पेट्रोलचे दर ७९.९२ रुपये प्रति लिटर असे झाले. गेल्या १९ दिवसांत पेट्रोलच्या दरामध्ये एकूण ८.६६ रुपयांनी वाढ झाली आहे.

Petrol and diesel to reach 100 in Modi's state? | पेट्रोल अन् डिझेल लवकरच शंभरी गाठणार?

पेट्रोल अन् डिझेल लवकरच शंभरी गाठणार?

Next

नवी दिल्ली: इंधनाची सतत होणारी दरवाढ पाहता देशातील पेट्रोल, डिझेलचे दर लवकरच शंभरपर्यंत जातील,  अशी भीती व्यक्त होत आहे. दरवाढीमुळे मालवाहतूकही महागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच ठेवल्याने राजधानीत डिझेलची किंमत प्रथमच ८० रुपयांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी आणि गुरुवारीही दरवाढ करण्यात आल्याने डिझेलचे दर एका लिटरला १०.६३ रुपयांनी वाढले होते. पेट्रोलियम कंपन्यांनी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. या वाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये डिझेलचे दर लिटरला १४ पैशांनी वाढून ८०.०२ रुपये असे झाले होते. प्रथमच डिझेलच्या दराने ८० रुपयांची पातळी ओलांडलेली दिसून आली. गेल्या १९ दिवसांत डिझेल १०.६३ रुपयांनी महागले आहे. पेट्रोलच्या दरामध्येही इंधन कंपन्यांनी लिटरमागे १६ पैशांची वाढ केली होती. यामुळे दिल्लीमध्ये आता पेट्रोलचे दर ७९.९२ रुपये प्रति लिटर असे झाले. गेल्या १९ दिवसांत पेट्रोलच्या दरामध्ये एकूण ८.६६ रुपयांनी वाढ झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलवर विविध राज्य सरकारांकडून अबकारी कर तसेच व्हॅट यांची आकारणी केली जाते. त्यामुळे इंधनाच्या जाहीर झालेल्या दरांपेक्षा प्रत्येक राज्यामध्ये अधिक रक्कम ग्राहकांना मोजावी लागते. पेट्रोल व डिझेल हे जीएसटीखाली आणण्याची मागणी केली जात असली तरी अनेक राज्यांचा त्याला विरोध आहे.
>दिल्ली : पेट्रोलचे दर ८० रुपयांची पातळी ओलांडून पुढे गेले. सलग २० व्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.
>मुंबई: मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८६.९१ रुपये आणि ७८.५१ रुपये प्रति लिटर आहेत. आधी कंपन्या ५ ते १० पैशांची दरवाढ करीत. मात्र अनलॉकनंतर पेट्रोल व डिझेल १0 रुपयांनी महागले.

Web Title: Petrol and diesel to reach 100 in Modi's state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.