दोन दिवस FREE मिळणार पेट्रोल-डिझेल, करा फक्त एवढंच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 13:27 IST2017-11-23T13:22:31+5:302017-11-23T13:27:59+5:30
पेट्रोल-डिझेलच्या किंमती कधी कमी होणार हा नेहमीच कानावर पडणारा प्रश्न. पण स्वस्त होण्याऐवजी पेट्रोलचे भाव वाढत आहेत. पण आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण तुम्हाला आता पेट्रोल-डिझेल अगदी फ्री मिळू शकतं.

दोन दिवस FREE मिळणार पेट्रोल-डिझेल, करा फक्त एवढंच
नवी दिल्ली: पेट्रोल-डिझेलच्या किंमती कधी कमी होणार हा नेहमीच कानावर पडणारा प्रश्न. पण स्वस्त होण्याऐवजी पेट्रोलचे भाव वाढत आहेत. पण आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण तुम्हाला आता पेट्रोल अगदी फ्री मिळू शकतं. यासाठी तुम्हाला फक्त एक खास मार्ग अवलंबावा लागणार आहे.
कसं मिळवाल फ्री पेट्रोल -
मोबाइल वॉलेट मोबिक्विकने ही ऑफर आणली आहे. याद्वारे एका ठरावीक कालावधीत पेट्रोल-डीझेल भरल्यास तुम्हाला 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. पण आता या ऑफरचा फायदा उचलण्यासाठी तुमच्याकडे केवळ आजचा आणि उद्याचाच दिवस आहे. 20 नोव्हेंबरला या ऑफरची सुरूवात झाली असून उद्या म्हणजे 24 नोव्हेंबरला शेवटचा दिवस आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत पेट्रोल भरावं लागेल. दरम्यान तुम्हाला मोबिक्विक मोबाइल वॉलेटने पेमेंट करावं लागेल. यासाठी किमान 10 रूपयांचं पेट्रोल भरावं लागेल. 100 टक्के कॅशबॅकची ऑफर असली तरी यासाठी कंपनीने 100 रूपयांची मर्यादा ठेवली आहे.
पेमेंट करण्यासाठी कोणत्या कूपन कोडची गरज नाही. तर पेट्रोल पंपावर पेमेंट करताना केवळ क्यूआर (QR) कोड स्कॅन करावं लागेल. यानंतर आपण जेवढ्या रूपयांचं पेट्रोल टाकलं असेल तो आकडा टाकावा. त्यानंतर तुम्हाला 100 टक्के कॅशबॅक 24 तासांच्या आत मिळेल. ही कॅशबॅक तुम्ही पुन्हा पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वापरू शकतात.