पेट्रोल स्वस्त, डिङोल महाग
By admin | Published: August 31, 2014 03:45 AM2014-08-31T03:45:02+5:302014-08-31T03:45:02+5:30
पेट्रोल प्रतिलीटर 1 रुपया 82 पैशांनी स्वस्त केल्याने महागाईने हैराण असलेल्या सर्वसामान्य जनतेला थोडासा दिलासा मिळणार असला, तरी डिङोल प्रतिलीटर 50 पैशांनी महाग करून हादराही देण्यात आला आहे.
Next
फटका बसणार : एका हाताने दिले, दुस:या हाताने घेतले
नवी दिल्ली : पेट्रोल प्रतिलीटर 1 रुपया 82 पैशांनी स्वस्त केल्याने महागाईने हैराण असलेल्या सर्वसामान्य जनतेला थोडासा दिलासा मिळणार असला, तरी डिङोल प्रतिलीटर 50 पैशांनी महाग करून हादराही देण्यात आला आहे. सर्व आवश्यक वस्तूंसह मालवाहतुकीचा डोलारा डिङोलवरच असल्याने महागाईची धग आणखी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने एका हाताने दिलासा देत दुस:या हाताने महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला तडाखाही दिला आहे.
सुधारित दर शनिवारी मध्यरात्रीपासूनच लागू होणार असल्याचे तेल कंपन्यांनी घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर उतरल्याने पेट्रोलचे दर प्रतिलीटर 1 रुपया 51 पैशांनी स्वस्त करण्यात आले आहे. स्थानिक विक्रीकर आणि व्हॅटसह दिल्लीत पेट्रोल 1 रुपया 82 पैशांनी स्वस्त होईल. दिल्लीत सध्या पेट्रोलचा दर प्रतिलीटर 7क्.33 रुपये असून, तो आता सुधारित दरानुसार प्रतिलीटर 68 रुपये 51 पैसे होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आंतरराष्ट्रीय बाजाराशी मेळ
आंतरराष्ट्रीय बाजाराशी मेळ राखण्यासाठी डिङोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय जानेवारी 2क्13 मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार डिङोलचे दर 5क् पैशांनी वाढविण्यात आले आहेत, असे तेल विपणन कंपनीच्या सूत्रंनी सांगितले. तथापि, स्थानिक करानुसार पेट्रोलच्या दरात तफावत राहील.
चालू महिन्यात पेट्रोल दरात करण्यात आलेली ही तिसरी कपात होय. 1 ऑगस्ट रोजी पेट्रोल दर 9क् पैशांनी कमी करण्यात आले. त्यानंतर पुन्हा 1 रुपया 81 पैशांनी कमी केले होते.
विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात
कच्च्या तेलाचे भाव उतरल्याने विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरही 19 रुपयांनी स्वस्त केले आहे, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या सरकारी तेल विपणन कंपनीने सांगितले.
प्रत्येक कुटुंबासाठी निर्धारित
कोटा (वर्षाकाठी सवलतीचे 12 सिलिंडर) संपल्यानंतर ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागते. दिल्लीत सबसिडीतील एलपीजी सिलिंडरचा दर (प्रति 14.2 किलो) 414 रु. आहे, तर विनाअनुदानित सिलिंडरचा दर सध्या 92क् रुपये असून, तो उद्यापासून 9क्1 रुपये होईल.
याशिवाय ठोक डिङोलच्या दरातही कपात करण्यात आली आहे. दिल्लीत ठोक डिङोलच्या दरात प्रतिलीटर 1.32 रुपयांची घट केली आहे. सरकारी धोरणानुसार रेल्वे, संरक्षण, मार्ग परिवहन महामंडळ यासारखे ठोक ग्राहक बाजारातील दरानुसार डिङोल खरेदी करतात.