जुलैपासून पेट्रोल ६ रुपयांनी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 06:47 AM2017-08-28T06:47:44+5:302017-08-28T06:48:10+5:30
जुलैपासून पेट्रोलच्या दरात ६ रुपयांची वाढ झाली आहे, तर डिझेलचे दर ३.६७ रुपयांनी वाढले आहेत. पेट्रोलचे दर सध्या तीन वर्षांच्या उच्चांकावर आहेत.
नवी दिल्ली : जुलैपासून पेट्रोलच्या दरात ६ रुपयांची वाढ झाली आहे, तर डिझेलचे दर ३.६७ रुपयांनी वाढले आहेत. पेट्रोलचे दर सध्या तीन वर्षांच्या उच्चांकावर आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनींच्या आकडेवारीनुसार, जुलैच्या सुरुवातीपासून डिझेलच्या दरात ३.६७ रुपयांची वाढ झाली आहे. सध्या दिल्लीत डिझेलचे दर ५७.०३ रुपये लीटर म्हणजेच चार महिन्यांच्या उच्चांकावर आहेत. १६ जून रोजी दिल्लीत पेट्रोलचे दर ६५.०६ रुपये लीटर होते. त्यानंतर फक्त चार दिवस वगळता दररोज पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. या चार दिवसांत पेट्रोलचे दर २ ते ९ रुपयांनी कमी झाले होते. डिझेलचे दर १६ जून रोजी ५४.४९ रुपये लीटर होते, तर २ जुलै रोजी ५३.३६ रुपये लीटर होते. त्यानंतर डिझेलच्या दरात वाढ होत आहे.
दिल्लीत पेट्रोल दर ६९.०४ रुपये आहे. आॅगस्ट २०१४ च्या दुसºया पंधरवड्यानंतरचे हे सर्वाधिक दर आहेत. त्या वेळी पेट्रोल ७०.३३ रुपये होते. १५ वर्षांची परंपरा मोडत पेट्रोलियम कंपन्या १६ जूनपासून पेट्रोलचे दर रोजच्या रोज निश्चित करत आहेत.