पेट्रोल २.२५ रुपये तर डिझेल फक्त ४२ पैशांनी स्वस्त

By admin | Published: July 15, 2016 09:50 PM2016-07-15T21:50:44+5:302016-07-15T21:50:44+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट झाल्याचा परिणाम म्हणून शुक्रवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २.२५ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ४२

Petrol costs Rs 2.25 while diesel is only 42 paise cheaper | पेट्रोल २.२५ रुपये तर डिझेल फक्त ४२ पैशांनी स्वस्त

पेट्रोल २.२५ रुपये तर डिझेल फक्त ४२ पैशांनी स्वस्त

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.१५ - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट झाल्याचा परिणाम म्हणून शुक्रवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २.२५ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ४२ पैशांची घट करण्यात आली. पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. ही नवी दरकपात शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आली.
याआधी १ जुलैमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर ८९ पैसेआणि डिझेलचे दर प्रति लिटर ४९ पैशांनी कमी करण्यात आले होते. तथापि त्याआधी १ मेपासून सलग चारवेळा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती.

Web Title: Petrol costs Rs 2.25 while diesel is only 42 paise cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.