Lowest Price of the Year: 2018च्या शेवटच्या दिवशी पेट्रोलची कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 07:50 AM2018-12-31T07:50:30+5:302018-12-31T09:16:48+5:30
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.47 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 25 पैशांची घट झाली आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.47 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 25 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 65.76 रुपयांवर आला आहे. पेट्रोल व डिझेलच्या देशांतर्गत किंमतींनी चालू वर्षातील नवा नीचांक नोंदवला आहे.
दिल्लीतही इंधनाचे दर घटले आहेत. दिल्लीतही पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 68.84 रुपये मोजावे लागणार आहे. तर डिझेलच्या दरात 23 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 62.86 रुपयांवर आला आहे.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - मुंबई)
Petrol and diesel prices at Rs 68.84/litre & Rs 62.86/litre respectively in Delhi. In Mumbai, petrol and diesel prices at Rs 74.47/litre & Rs 65.76/litre respectively pic.twitter.com/ANuCT3srpZ
— ANI (@ANI) December 31, 2018
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये घसरण होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - दिल्ली)