सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा वार; पेट्रोल 87 पार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 08:27 AM2018-09-09T08:27:13+5:302018-09-09T10:20:11+5:30
पेट्रोल-डिझेल दरवाढीने नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला आहे.
नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेल दरवाढीने नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळू लागली आहे. मात्र, प्रशासन ही दरवाढ सर्वस्वी तेल कंपन्यांकडून होत असल्याचे सांगत वेळ मारून नेत आहे. ‘अच्छे दिन’ हेच का? असा सवाल सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असून मुंबईत पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. मुंबईत रविवारी (9 सप्टेंबर) पेट्रोल 12 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 11 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर 87.89 तर डिझेलचा प्रति लिटर दर 77.09 झाला आहे.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम)
रोज इंधन दरवाढ; पण सरकार व भाजपा गप्पच, सोमवारी ‘भारत बंद’
राजधानी दिल्लीत पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 10 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एका लिटरमागे 80.50 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 72.61 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.
Petrol & Diesel prices in #Delhi are Rs.80.50 per litre & Rs.72.61 per litre, respectively. Petrol & Diesel prices in #Mumbai are Rs.87.89 per litre & Rs.77.09 per litre, respectively. pic.twitter.com/2mBXMtZwVv
— ANI (@ANI) September 9, 2018
सलग 15 दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू आहे. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे. धान्ये, खाद्यान्न, भाजीपाला, प्रवास सारेच महागल्याने सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती आहे.