इंधन दरवाढ सुरुच, मुंबईत पेट्रोलसाठी मोजावे लागणार 89.69 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 08:35 AM2018-09-21T08:35:21+5:302018-09-21T09:29:07+5:30

पेट्रोल-डिझेल वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळू लागली आहे.

Petrol, diesel prices continue to soar; Mumbai at all-time high of Rs 89.69 per litre | इंधन दरवाढ सुरुच, मुंबईत पेट्रोलसाठी मोजावे लागणार 89.69 रुपये

इंधन दरवाढ सुरुच, मुंबईत पेट्रोलसाठी मोजावे लागणार 89.69 रुपये

Next

नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. मुंबईत शुक्रवारी (21 सप्टेंबर) पेट्रोल 9 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रतिलिटर दर 89.69 दर तर डिझेलचा प्रतिलिटर दर 78.42 झाला आहे. 

(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम)



राजधानी दिल्लीत पेट्रोल 10 पैशांनी महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 82.32 रुपये तर डिझेलसाठी प्रतिलिटर 73.87 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.

पेट्रोल-डिझेल वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळू लागली आहे. मात्र, प्रशासन ही दरवाढ सर्वस्वी तेल कंपन्यांकडून होत असल्याचे सांगत वेळ मारून नेत आहे. ‘अच्छे दिन’ हेच का? असा सवाल सामान्य नागरिक विचारू लागले आहेत. इंधनाच्या दरवाढीने नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला आहे.

Web Title: Petrol, diesel prices continue to soar; Mumbai at all-time high of Rs 89.69 per litre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.