राज्यांनी ठरवलं तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात, पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 09:32 AM2021-08-19T09:32:12+5:302021-08-19T09:33:18+5:30

Petrol-Diesrl Price news: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी भाष्य केलं आहे.

Petrol-diesel prices may come down if states decide, says Petroleum Minister hardeep singh puri | राज्यांनी ठरवलं तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात, पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

राज्यांनी ठरवलं तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात, पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Next

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झपाट्यानं वाढ होत आहे. देशातील जवळजवळ सर्व ठिकाणी पेट्रोलच्या किमतीनं शंभरी पार केलीये तर डिझेल शंबरच्या जवळ गेले आहे. दरम्यान, या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मोठं विधान केलं आहे.

मीडियाशी बातचीतदरम्यान हरदीप सिंह पुरी यांना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, केंद्र सरकार याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. पेट्रोलच्या किंमतींमध्ये दिलासा देण्याबाबत सरकारकडून शक्य ते सर्व प्रयत्न सुरू आहे. 10 टक्के मिश्रणसारखे प्रयोग करून इंधनाच्या किंमती कमी करण्याबाबत प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकार इंधनावर एक्साइज ड्युटी लावत असते, तर राज्य त्यावर वॅट लावते. आता राज्य सरकारांची इच्छाशक्ती असेल तर ते पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करू शकतात, असे ते म्हणाले.  

सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दरात कपात
तब्बल एक महिन्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या दरात बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. 17 जुलैपासून पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नव्हता. मात्र, आज (गुरुवारी) पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. तर, डिझेलच्या दरात कपात केली आहे. गेले सलग 33 दिवस पेट्रोलचे दर स्थिर असून, चार महिन्यांनंतर डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी 20 पैशांची कपात करण्यात आली आहे. 

मे महिन्यात सर्वाधिक वाढ
मे महिन्यात इंधन दरात प्रचंड वाढ झाली होती. सलग 42 वेळा झालेल्या दरवाढीने पेट्रोल 11.52 रुपयांनी महागले होते. तर 41 वेळा दरवाढीनंतर डिझेलमध्ये 9.8 रुपयांची वाढ झाली होती. दरम्यान, गुरुवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 107.83 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये आहे. तर, मुंबईत डिझेलचा दर 97.04 आणि दिल्लीत 89.47 रुपये आहे.

Web Title: Petrol-diesel prices may come down if states decide, says Petroleum Minister hardeep singh puri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.