सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 06:04 AM2020-06-10T06:04:56+5:302020-06-10T06:05:03+5:30

जागतिक बाजारात ४० डॉलरवर राहिलेल्या ब्रेन्ट क्रूडच्या किमती आणि भारतात इंधनाची वाढती मागणी यामुळे तेल कंपन्यांनी मंगळवारी सलग तिसºया दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली.

Petrol-diesel prices rose for third day in a row | सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

googlenewsNext

नवी दिल्ली : जागतिक बाजारात ४० डॉलरवर राहिलेल्या ब्रेन्ट क्रूडच्या किमती आणि भारतात इंधनाची वाढती मागणी यामुळे तेल कंपन्यांनी मंगळवारी सलग तिसºया दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १६ मार्चपासून ८० दिवसांपेक्षा जास्त काळ कंपन्यांनी इंधन दरातील सुधारणा बंद केली होती. त्यानंतर प्रथमच सलग तिसºया दिवशी दरवाढ होत आहे. पेट्रोल ५४ पैशांनी, तर डिझेल ५८ पैशांनी महागले आहे. अवघ्या तीन दिवसांत दोन्ही इंधनांच्या दरात १.७ रुपयांची वाढ झाली आहे.

च्नवी दिल्ली : पेट्रोल- ७३ , डिझेल ७१.१७ रुपये
च्मुंबई : पेट्रोल- ८०.०१ रुपये, डिझेल- ६९.९२ रुपये
च्चेन्नई : पेट्रोल- ७७.०८ रुपये, डिझेल- ६९.७४ रुपये
च्बंगळुरू : पेट्रोल- ७५.३५ रुपये, डिझेल- ६७.६६

Web Title: Petrol-diesel prices rose for third day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.