दोन राज्यांनी उपकर लावल्यामुळे पेट्राेल, डिझेल हाेणार महाग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 06:43 AM2023-02-04T06:43:56+5:302023-02-04T06:44:27+5:30
Petrol, Diesel Price: दाेन राज्यांनी उपकर लावल्यामुळे पेट्राेल आणि डिझेलवर उपकर लावला आहे. त्यामुळे या ठिकाणी या इंधनांचे दर वाढणार आहे.
चंडीगड/तिरुअनंतपुरम : दाेन राज्यांनी उपकर लावल्यामुळे पेट्राेल आणि डिझेलवर उपकर लावला आहे. त्यामुळे या ठिकाणी या इंधनांचे दर वाढणार आहे. केरळ आणि पंजाब या राज्य सरकारांनी हा निर्णय घेतला आहे. केरळचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात पेट्राेल, डिझेल आणि मद्यावर सामाजिक सुरक्षा उपकर लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार पेट्राेल आणि डिझेलवर प्रति लीटर २ रुपये एवढा अधिभार लावण्यात येणार आहे.
पंजाबमध्ये लागणार ९० पैसे अधिभार
पंजाबमध्ये पेट्राेल आणि डिझेलवर ९० पैसे प्रतिलीटर एवढा अधिभार लावण्यात येणार आहे. मान सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाबला पैशांची गरज आहे. दीर्घ काळापासून याबाबत विचार सुरू हाेता, असे नगरविकास मंत्री अमन अराेरा यांनी सांगितले.