पेट्राेलचे दर शतकाकडे; डिझेलमध्येही वाढ सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 04:39 AM2021-02-12T04:39:36+5:302021-02-12T04:40:38+5:30

सलग तिसऱ्या दिवशी दरवाढ, दिलासा नाहीच

Petrol price close to Rs 95 mark diesel near Rs 85 level in Mumbai | पेट्राेलचे दर शतकाकडे; डिझेलमध्येही वाढ सुरूच

पेट्राेलचे दर शतकाकडे; डिझेलमध्येही वाढ सुरूच

Next

नवी दिल्ली : तेल वितरक कंपन्यांनी पेट्राेल आणि डिझेलचे दर सलग तिसऱ्या दिवशी वाढविले आहे. पेट्राेलचे दर २५ पैसे तर डिझेलचे दर ३१ पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे मुंबईत पेट्राेलचे दर ९४.३६ रुपये तर डिझेलचे दर ८४.९४ रुपये प्रतिलिटर झाले आहे. 

देशात गंगानगर येथे एका लिटर पेट्राेलसाठी ९८.३० रुपये प्रतिलिटर माेजावे लागत आहेत.  अशाच पद्धतीने दरवाढ कायम राहिल्यास काही दिवसांमध्येच पेट्राेलचे दर शंभरी पार करतील, असे चित्र आहे. 

त्यातच केंद्र सरकारने इंधनावरील शुल्क कपात करणार नसल्याचे स्पष्ट केले हाेते. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता मावळली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत.

परभणीत पेट्रोलचे दर राज्यात सर्वाधिक
दिल्लीमध्ये पेट्राेलची किंमत ८७.८५ रुपये तर डिझेलची किंमत ७८.०३ रुपये प्रतिलिटर झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. राज्यात परभणी येथे पेट्राेलचे दर सर्वाधिक ९६.४८ रुपये प्रतिलिटरपर्यंत पाेहाेचले आहेत. 
 

Web Title: Petrol price close to Rs 95 mark diesel near Rs 85 level in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.