Petrol Price Cut: पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी कपात; या राज्य सरकारने सामान्यांना दिला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 06:27 PM2021-08-13T18:27:07+5:302021-08-13T18:28:10+5:30

huge Petrol Price Cut in Tamilnadu: अर्थ मंत्री पलानीवेल थियागा राजन यांनी तामिळनाडू विधानसभेमध्ये 2021-22 चे सुधारित बजेट मांडले. यामुळे राज्य सरकारला 1160 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. राजन यांनी यंदाच्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये ही कर कपात केली आहे.

Petrol Price Cut in Tamilnadu by 3 rupees per liter; fuel rate in Chennai rate under 100  | Petrol Price Cut: पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी कपात; या राज्य सरकारने सामान्यांना दिला मोठा दिलासा

Petrol Price Cut: पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी कपात; या राज्य सरकारने सामान्यांना दिला मोठा दिलासा

Next

तामिळनाडू सरकारने (Tamilnadu govt) महागाई आणि कोरोनाच्या कात्रीत सापडलेल्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या किंमतीत मोठी कपात (Petrol Price Cut) केली आहे. अर्थ मंत्री पलानीवेल थियागा राजन यांनी विधानसभेमध्ये 2021-22 चे सुधारित बजेट मांडले. यामध्ये ही घोषणा करण्यात आली. (Petrol Price Cut By ₹ 3 In Tamil Nadu At Cost Of ₹ 1,160 Crore To State)

Scrappage Policy benefits: स्क्रॅपिंग पॉलिसीचे फायदेच फायदे; जाणून घ्या वाहन मालकांना काय मिळणार...

तामिळनाडू सरकारने एक्साईज ड्युटीमध्ये (Excise Duty) कपात करत पेट्रोलचा दर प्रति लीटरला तीन रुपयांनी कमी केला आहे. यामुळे राज्य सरकारला 1160 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. राजन यांनी यंदाच्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये ही कर कपात केली आहे. राज्यातील लोकांना दिलासा देण्यासाठी ही नुकसान झेलून कपात केल्याचे त्यांनी सांगितले. 

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मीटरमध्ये जेवढे पैसे तेवढीच वीज वापरता येणार, जाणून घ्या...
 

तामिळनाडूमध्ये 2.63 कोटी दुचाकी वाहने आहेत. सामान्य जनता याच वाहनांवरून प्रवास करते. यामुळे पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतींमुळे त्रस्त होते. इंधनाच्या दरात जी प्रचंड वाढ झाली आहे त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. पेट्रोलियम पदार्थांमध्ये कर वाढविल्यामुळे त्यांना मोठा फायदा झाला आहे. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन सामान्य लोकांचे, गरीबांचे दु:ख समजतात, यामुळे कर कपातीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Tata vs Reliance: सुरु झाली लढाई! टाटांच्या कंपनीचे बाजारमुल्य रिलायन्सच्या नजीक येऊन ठेपले

एम के स्टॅलिन सरकारचे हे पहिले बजेट होते. याच वर्षी डीएमकेने बहुतमाने सरकार स्थापन केले होते. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 102.49 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर आहे. 

Simple One: सो सिंपल! केवळ 1,947 रुपयांत बुक करा 240 किमी रेंजवाली स्कूटर; 15 ऑगस्टला होणार लाँच

केंद्रावर गंभीर आरोप
राजन .यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आलेल्या श्वेत पत्रानुसार यामध्ये असे अनेक पर्याय सांगण्यात आले आहेत जे देशातील संघभावना कमजोर करतात. ही भावना पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत मात्र अधिक दिसते. पेट्रोलवर मे 2014 मध्ये केंद्राचा एकूण कर हा 10.39 रुपये प्रति लीटर होता. तो आता वाढून 32.90 रुपये प्रति लीटर झाला आहे. तर डिझेलवर 3.57 रुपये होता, तो आता वाढून 31.80 रुपये करण्यात आला आहे. 

Web Title: Petrol Price Cut in Tamilnadu by 3 rupees per liter; fuel rate in Chennai rate under 100 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.