इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल, डिझेलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार?; जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 06:44 PM2020-06-02T18:44:46+5:302020-06-02T18:46:12+5:30

ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणं महाग होणार आहे. सामान्यांना पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

petrol price india crude oil price rise ahead opec meeting extended output cut SSS | इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल, डिझेलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार?; जाणून घ्या कारण

इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल, डिझेलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार?; जाणून घ्या कारण

Next

नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये आता सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार हा थोडा वाढू शकतो. कारण इंधन दरवाढीचा भडका उडणार असून पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता आहे. सामान्यांना पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणं महाग होणार आहे.

कच्च्या तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणारी संघटना OPEC (Organization of the Petroleum Exporting Countries) ची जूनमध्ये एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या बैठकीमध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये झालेली कपात यावर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारबरोबरच सामान्य नागरिकांच्या खिशावरही मोठा परिणाम होऊ शकतो. भारतात आवश्यक गरजांसाठी 83 टक्के कच्च्या तेलाची आयात केली जाते आणि याकरता वार्षिक 100 अब्ज डॉलर मोजावे लागतात. रुपयाचे कमी असणार मूल्य या रकमेमध्ये आणखी वाढ करतं आणि सरकार याची भरपाई करण्यासाठी अधिक टॅक्स आकारते.

ओपेक आणि सहकारी देश जूनमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणाऱ्या बैठकीमध्ये जुलै किंवा ऑगस्टमध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन दररोज 97 लाख बॅरलने कमी करण्याचा विचार होऊ शकतो. जगभरात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या उत्पादनाच्या 10 टक्के हे उत्पादन आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. गेल्या 4 आठवड्यात ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत दुप्पट झाली आहे. ओपेक आणि सहयोगी देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात जारी ठेवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती आता देखील 40 टक्के कमीच आहेत.

तज्ज्ञांच्या मते पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये होणाऱ्या बदलासाठी कच्च्या तेलाचे दरही कारणीभूत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात जरी कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या तरी देशांतर्गत बाजारात पेट्रोल डिझेलच्या किंमती का कमी होत नाहीत याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे भारतामध्ये पेट्रोल-डिझेलवर टॅक्स आकारला जातो. देशात सध्या पेट्रोलवर 19.98 रुपये एक्साइज ड्यूटी आहे, तर वॅटसाठी 15.25 रुपये आकारण्यात येतात.

पेट्रोल पंपाच्या डीलरला 3.55 रुपये कमिशन देण्यात येतं. प्रत्येक राज्यासाठी वॅटचे दर वेगवेगळे आहेत. 15 ते 33-34 रुपयांदरम्यान हे दर आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही वेगळ्या आहेत. एक लीटर डिझेलवर हा टॅक्स 28 रुपये आहे. म्हणजेच पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतील अधिकतर हिस्सा हा टॅक्स आहे. दुसरं म्हणजे डॉलरच्या तुलनेत रूपयाचे मूल्य कमी आहे. अर्थव्यवस्थेत घसरण होऊन रुपयाचे मूल्य देखील कमी होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नसल्याने विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी?

'आता नरेंद्र मोदी कोठे आहेत?'; कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल

CoronaVirus News : बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय... कोरोना योद्ध्याच्या लेकीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus News : लय भारी! कपडे असो वा वस्तू 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने होणार व्हायरसमुक्त 

 

Web Title: petrol price india crude oil price rise ahead opec meeting extended output cut SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.