मुंबईत पेट्रोलची नव्वदीकडे कूच...महाराष्ट्रात नव्वदीपार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 08:13 AM2018-09-17T08:13:43+5:302018-09-17T08:43:45+5:30
सहा महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये पेट्रोल 80.11 तर 66.85 रुपयांना मिळत होते.
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील रुपयाची घसरण आणि वाढवलेले कर यामुळे नागरिकांना महागाईचा फटका बसत असून आजही पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 7 पैशांनी वाढले.
मागील काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेलचे दर कमालीचे वाढले आहेत. सहा महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये पेट्रोल 80.11 तर 66.85 रुपयांना मिळत होते. मात्र, गेल्या सहा महिन्यात पेट्रोल 9.27 आणि डिझेल 11.50 रुपयांनी वाढले आहे. आज पेट्रेलचा मुंबईतील दर 89.44 तर डिझेलचा दर 78.33 रुपये प्रती लिटर आहे. तर दिल्ली मध्ये पेट्रोल 82.06 आणि डिझेल 73.78 रुपये आहे. दिल्लीमध्ये डिझेल 6 पैशांनी वाढले आहे.
तर सिंधुदुर्गमध्ये पेट्रोल 90.45, परभणीमध्ये 91.22 नांदेडमध्ये 91 रुपयांवर पोहोचले आहे.
Petrol at Rs 82.06/litre (increase by Rs 0.15/litre) and diesel at Rs 73.78/litre (increase by Rs 0.6/litre) in Delhi. Petrol at Rs 89.44/litre (increase by Rs 0.15/litre) and diesel at Rs 78.33/litre (increase by Rs 0.7/litre) in Mumbai. pic.twitter.com/Z9Yk0KnJOp
— ANI (@ANI) September 17, 2018
जनतेला इंधनदरवाढीचा फटका बसत असताना केंद्रीय मंत्र्यांची वक्तव्ये त्यांचा जखमांवर मीठ चोळत आहेत. रामदास आठवले यांनी आपल्याला मोफत असल्याने पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा काही फरक पडत नसल्याचे बेताल वक्तव्य केले होते. मात्र, टीकेचे धनी झाल्यामुळे त्यांनी या वक्तव्यावर माफी मागितली होती.
गेल्या वर्षी याच दिवशी पेट्रोल 79.6 तर डिझेल 62.49 रुपयांवर होते.