पेट्रोल १.२९ तर डिझेल ९७ पैशांनी महागले
By admin | Published: January 1, 2017 11:24 PM2017-01-01T23:24:18+5:302017-01-01T23:24:18+5:30
पेट्रोल रविवार मध्यरात्रीपासून १.२९ रुपयांनी वाढले तर डिझेल ९७ पैशांनी महाग झाले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - पेट्रोल रविवार मध्यरात्रीपासून १.२९ रुपयांनी वाढले तर डिझेल ९७ पैशांनी महाग झाले. पेट्रोल एका महिन्यात तिसऱ्यांदा तर डिझेल पंधरवड्यात दुसऱ्यांदा वाढले आहे. दरवाढीचा हा निर्णय तेल कंपन्यांनी जाहीर केला. त्यांनी राज्यांचे कर वगळून ही वाढ जाहीर केली असून प्रत्यक्षात ही वाढ जास्त असेल. व्हॅटचा विचार केल्यानंतर दिल्लीत पेट्रोल १.६६ तर डिझेल १.१४ रुपये महाग झाले आहे. १७ डिसेंबर रोजी पेट्रोल २.२१ तर डिझेल १.७९ रुपये स्थानिक कर वगळता महागले होते. व्हॅटचा विचार केल्यानंतर प्रत्यक्षात दिल्लीमध्ये पेट्रोल २.८४ आणि डिझेल २.११ रुपये लिटरमागे महागले होते.
इंडियन आॅईल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड प्रत्येक महिन्याच्या एक आणि १६ तारखेला पेट्रोल व डिझेलच्या दरांचा आधीच्या पंधरवड्यातील आंतरराष्ट्रीय बाजारातील सरासरी भावांच्या आधारावर आढावा घेते.