मेपासून रविवारी पेट्रोल पंप बंद

By admin | Published: April 19, 2017 03:24 AM2017-04-19T03:24:20+5:302017-04-19T03:24:20+5:30

इंधनाचा वापर कमी करून वाहनांच्या धुरामुळे होणाऱ्या पर्यावरण ऱ्हासाला आळा घालण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत

Off the petrol pump from May | मेपासून रविवारी पेट्रोल पंप बंद

मेपासून रविवारी पेट्रोल पंप बंद

Next

चेन्नई : इंधनाचा वापर कमी करून वाहनांच्या धुरामुळे होणाऱ्या पर्यावरण ऱ्हासाला आळा घालण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, महाराष्ट्रासह आठ राज्यांमधील सुमारे २० हजार पेट्रोल पंप येत्या १४ मेपासून दर रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्याचे पंप चालकांच्या राष्ट्रीय संघटनेने ठरविले आहे.कन्सॉर्शियम आॅफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सचे कार्यकारिणी सदस्य सुरेश कुमार यांनी सांगितले की, शनिवारची मध्यरात्र ते रविवारची मध्यरात्र असे २४ तास पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येतील. ज्या पंपांवर एरवी १५ किंवा त्याहून जास्त कर्मचारी असतात, तेथे रविवारी आणीबाणीच्या प्रसंगी पेट्रोल देण्यासाठी एक कर्मचारी असेल. हा निर्णय फक्त खासगी पेट्रोल पंपांपुरता आहे. जे पंप तेलकंपन्या स्वत: चालवितात, त्यांचे काय, असे विचारता, सुरेश कुमार म्हणाले की, ‘त्यांनाही आम्ही विनंती केली आहे.’ 

Web Title: Off the petrol pump from May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.