पेट्रोल ३.९६ तर डिझेल २.३७ रुपयांनी महाग

By admin | Published: May 1, 2015 02:45 AM2015-05-01T02:45:52+5:302015-05-01T02:45:52+5:30

सलग दोनदा दरकपात केल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोलच्या दरात ३.९६ रुपये आणि डिझेलच्या दरात २.३७ रुपयांची वाढ केली आहे.

Petrol will cost Rs 3.9 a liter, while diesel is priced at Rs 2.37 a liter | पेट्रोल ३.९६ तर डिझेल २.३७ रुपयांनी महाग

पेट्रोल ३.९६ तर डिझेल २.३७ रुपयांनी महाग

Next

नवी दिल्ली : सलग दोनदा दरकपात केल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोलच्या दरात ३.९६ रुपये आणि डिझेलच्या दरात २.३७ रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलची ही दरवाढ गुरुवारच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.
याआधी १६ एप्रिलला पेट्रोलच्या दरात ८० पैसे आणि डिझेलच्या दरात १.३० रुपयांची कपात करण्यात आली होती. तर त्याआधी २ एप्रिलला पेट्रोल ४९ पैसे आणि डिझेल १.२१ रुपयांनी स्वस्त झाले होते.
आजच्या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर ५९.२० रुपयांऐवजी ६३.१६ रुपयांत तर डिझेल प्रति लिटर ४७.२० रुपयांऐवजी ४९.५७ रुपयांत विकले जाईल, असे भारतातील सर्वांत मोठी तेल कंपनी इंडियन आॅईलने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Petrol will cost Rs 3.9 a liter, while diesel is priced at Rs 2.37 a liter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.