टार्गेट किलिंगचा पीएफआयचा कट, एनआयएच्या पथकाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 08:10 AM2023-02-09T08:10:52+5:302023-02-09T08:12:33+5:30

सोमवारी कादिरच्या घरी छापेमारी केली असता पीएफआयचे बॅनर व दोन तलवारी मिळाल्यानंतर पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

PFI conspiracy in target killing, NIA team claims | टार्गेट किलिंगचा पीएफआयचा कट, एनआयएच्या पथकाचा दावा

टार्गेट किलिंगचा पीएफआयचा कट, एनआयएच्या पथकाचा दावा

googlenewsNext

एस. पी. सिन्हा

पाटणा : देशात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफआय) प्रतिबंध घालल्यानंतरही बिहारमध्ये सक्रिय असलेल्या पीएफआयने आपला कट बदलला आहे. आता पीएफआय लष्कराप्रमाणे प्रशिक्षण देण्याऐवजी महत्त्वपूर्ण लोकांना टार्गेट करून त्यांना जिवे मारण्याचा कट रचत आहे, अशी माहिती एनआयएच्या पथकाने दिली आहे. संघटनेवर सरकारने कारवाई केल्यानंतर आता धार्मिक सद्भावना बिघडविण्यासाठी केवळ टार्गेट किलिंगवर लक्ष केंद्रित केले आहे. मुजफ्फरपूरमधील मो. गादिर अन्सारी याच्या घरी मागील सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पीएफआयच्या गुप्त बैठका झाल्याची माहिती आता उघड झाली आहे. 

सोमवारी कादिरच्या घरी छापेमारी केली असता पीएफआयचे बॅनर व दोन तलवारी मिळाल्यानंतर पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पूर्व चंपारणच्या चकियामधील बेलाल ऊर्फ इरशादच्या अटकेनंतर बरूराजमध्ये छापेमारी करण्यात आली होती. बिहार पीएफआय मॉड्यूलचा सदस्य याकूब हा फरार आहे. 

Web Title: PFI conspiracy in target killing, NIA team claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.