PFI फंडिंगबाबत मोठा खुलासा, आखाती देशांमध्ये राहणाऱ्या 500 हून अधिक लोकांची बँक खाती रडारवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 08:03 PM2022-09-28T20:03:57+5:302022-09-28T20:05:18+5:30

pfi funding : पीएफआयच्या विदेशी फंडिंगचे प्रकरण तपासादरम्यान उघड झाल्यानंतर अनेकांच्या बँक खात्यांचीही चौकशी करण्याची तयारी सुरू आहे.

pfi funding bank accounts of more than 500 people living in gulf countries are on the radar of investigating agencies | PFI फंडिंगबाबत मोठा खुलासा, आखाती देशांमध्ये राहणाऱ्या 500 हून अधिक लोकांची बँक खाती रडारवर!

PFI फंडिंगबाबत मोठा खुलासा, आखाती देशांमध्ये राहणाऱ्या 500 हून अधिक लोकांची बँक खाती रडारवर!

googlenewsNext

नवी दिल्ली : दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात केंद्र सरकारची कारवाई सुरूच आहे. सरकारने पीएफआयवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. त्याचबरोबर, पीएफआयच्या विदेशी फंडिंगचे प्रकरण तपासादरम्यान उघड झाल्यानंतर अनेकांच्या बँक खात्यांचीही चौकशी करण्याची तयारी सुरू आहे.

दरम्यान, तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, पीएफआय फंडिंगसाठी जवळपास अर्धा डझन आखाती देशांतून पैसे येत होते. पैसे पाठवणारे बहुतेक ते होते, जे कामाच्या शोधात भारतातून त्या देशांमध्ये गेले आहेत. आतापर्यंत 500 हून अधिक लोकांची बँक खाती वेगवेगळ्या तपास यंत्रणांसमोर रडारवर आहेत, त्यांची चौकशी करण्यासाठी यादी तयार करण्यात आली आहे.

देशाच्या विविध भागांतून अटक करण्यात आलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांच्या चौकशीत विदेशातून आणि विशेषत: आखाती देशातून दर महिन्याला 5 ते 6 कोटी रुपये मिळत असल्याचे समोर आले आहे. पैसे पाठवणारे बहुतांश केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहारमधील आहेत आणि विदेशात जाऊन पैसे कमवत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 500 हून अधिक लोक या तपासाच्या कक्षेत येत आहेत.

पैसे पाठवण्यासाठी कोड वर्डचा वापर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना पीएफआयच्या देशभरातील विविध कार्यालयांमधून अनेक  डायऱ्या मिळाल्या आहेत. यामध्ये कोणत्या व्यक्तीने पीएफआयच्या कोणत्या भागात किती रक्कम कुठून दिली याचा उल्लेख आहे. विशेष बाब म्हणजे या डायऱ्यांची एंट्री पॅनद्वारे करण्यात आली होती आणि त्यात कोड वर्डही नमूद करण्यात आला होता. आता या डायऱ्या ज्यांनी तयार केल्या, त्यांच्याकडील कोड वर्डच्या रहस्याची चौकशी सुरू आहे.

या राज्यांतील पीएफआय शाखांना सर्वाधिक फंडिंग
या डायऱ्यांमधील फंडिंगचे डिटेल्स आहेत, हे पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या बुकलेटशी मिळते-जुळते आहेत. पीएफआयच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तेलंगणा शाखांना गेल्या दोन वर्षांत विदेशातून सर्वाधिक फंडिंग मिळाले आहे. आता त्या खात्यांच्या तपासणीतून, पैशाचा मार्ग शोधला जात आहे, जो विदेशातून थेट पीएफआयच्या सर्वात खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत होता.

Web Title: pfi funding bank accounts of more than 500 people living in gulf countries are on the radar of investigating agencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.