पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचा पीएफआयने रचला होता कट, अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 08:03 AM2022-09-25T08:03:15+5:302022-09-25T08:05:06+5:30

गेल्या काही दिवसांपासून पीएफआयचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड केली जात असून त्यांच्या चौकशीतून नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. 

PFI had hatched a conspiracy to attack Prime Minister narendra Modi shocking information from the interrogation of the arrested accused | पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचा पीएफआयने रचला होता कट, अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती

पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचा पीएफआयने रचला होता कट, अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती

Next

बिहारची राजधानी पाटण्यात विधानसभा कार्यक्रमासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अटक करण्यात आलेल्या केरळमधील आरोपींनी केलेल्या धक्कादायक खुलाशाने खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएफआयचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड केली जात असून त्यांच्या चौकशीतून नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. 

केरळमध्ये अटक केलेल्या शफिक पायेथ याने एनआयए आणि ईडीच्या चौकशीत ही माहिती दिली. चौकशीतील माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांच्यावर पाटण्यात हल्ला करण्याचा कट पुन्हा एकदा आखण्यात येत होता. यासाठी एका प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. पीएफआय मॉड्यूल तयार करणे आणि अनेक संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्याचा कट होता.

देशविरोधी कारवायात गुंतल्याचा गंभीर आरोप पीएफआयवर असून, २२ सप्टेंबर रोजी एनआयएने उत्तर प्रदेश, केरळ आणि कर्नाटकसह १५ राज्यांत ९६ जागांवर धाडी टाकल्या होत्या. त्यात अनेकांना अटक करण्यात आली आहे. १२० कोटी रुपये आतापर्यंत जप्त होता. करण्यात आले आहेत. पीएफआयचे प्रकरण पाटण्याच्या फुलवारी शरीफमधून समोर आले होते. सुरुवातीला पाटणा पोलिसांनी तपास करत गुन्हा दाखल केला होता.

ठिकाण : पाटणा, तारीख : १२ जुलै

  • देशात पाळेमुळे मजबूत करण्यासाठी पीएफआयने पूर्ण रोडमॅप तयार केला आहे. त्यानुसार त्यांनी प्रथम केरळ व तेलंगणासह दक्षिण भारताच्या राज्यात स्वतःची स्थिती मजबूत केली. तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार, १२ जुलै रोजी पंतप्रधानांच्या पाटणा दौऱ्यात त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट होता. यासाठी पीएफआय शस्त्रे आणि स्फोटके तयार करण्याच्या तयारीत होता.
  • जुलैमध्येच संघटनेवर मोठी कारवाई झाली. या कारवाईत अनेक दस्तऐवज जप्त करण्यात आले. यात भारताला मुस्लिम राष्ट्र बनविण्याचे ब्लू प्रिंटही आहे

Web Title: PFI had hatched a conspiracy to attack Prime Minister narendra Modi shocking information from the interrogation of the arrested accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.