PM मोदींवर हल्ल्याचा आणि यूपीत स्फोटांचा रचला होता कट; PFIच्या कारस्थानांबाबत EDचा मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 11:24 AM2022-09-24T11:24:26+5:302022-09-24T11:26:53+5:30

नापाक मनसुब्यांसाठी जमवले 120 कोटी रुपये...!

pfi planned to attack pm narendra modi on july 12 at patna rally in bihar sensational claims by ed | PM मोदींवर हल्ल्याचा आणि यूपीत स्फोटांचा रचला होता कट; PFIच्या कारस्थानांबाबत EDचा मोठा खुलासा!

PM मोदींवर हल्ल्याचा आणि यूपीत स्फोटांचा रचला होता कट; PFIच्या कारस्थानांबाबत EDचा मोठा खुलासा!

Next

नवी दिल्ली - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. 12 जुलैला त्यांच्या पटणा रॅलीमध्ये स्फोट घडविण्याची तयारी करण्यात आली होती. यासाठी पीएफआयचे टेरर मॉड्यूल घातक शस्त्रास्त्रे जमविण्याच्या कामास लागले होते. एढेच नाही, तर पीएम मोदींच्या रॅलीवर हल्ला करण्यासाठी ट्रेनिंग कॅम्पचे आयोजनही करण्यात आले होते, असा खळबळजनक खुलासा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केला आहे. याशिवाय, पीएफआयने यूपीमध्येही संवेदनशील ठिकाणी आणि महत्वाच्या लोकांवर एकाच वेळी हल्ला करण्याची तयारीही कोली होती, असेही ईडीने म्हटले आहे.

महत्वाचे म्हणजे, जुलै महिन्यात पाटणा येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संशयितांना अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दस्तएवजांमध्ये 'इंडिया 2047' नावाने पीएफआयचे बुकलेटही होते. यात 2047 पर्यंत भारताला मुस्लीम देश बनविण्याचे 'दहशतवादी ब्ल्यूप्रिंट' होते. याच वेळी, पीएफआय आपल्या नापाक मनसुब्यांसाठी जागो-जागी ट्रेनिंग कॅम्प लावत आहे, असेही समोर आले होते.

पीएम मोदीच्या रॅलीवर हल्ला करण्याच्या हेतूने लावले होते ट्रेनिंग कॅम्प -
ईडीने गुरुवारी केरळमधून अटक करण्यात आलेल्या पीएफआयच्या शफिक पायथच्या रिमांड नोटमध्ये खळबळजनक दावा केला आहे. PFI ने यावर्षी 12 जुलैला पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीदरम्यान हल्ल्या करण्याच्या उद्देशाने ट्रेनिंग कॅम्प लावला होता. विशेष म्हणजे, ऑक्टोबर 2013 मध्ये पाटणा येथील गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या निवडणूक रॅलीवर दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित जिहादी दहशतवाद्यांनी घडवून आणला होता.

नापाक मनसुब्यांसाठी जमवले 120 कोटी रुपये -
देशभरात दंगे आणि दहशतवादी कारवाया करण्याच्या हेतूने PFI ने गेल्या काही वर्षांत 120 कोटी रुपये जमवले आहेत. या फंडात अधिकांस हिस्सा कॅशमध्ये आहे. ईडीकडे याची संपूर्ण माहिती आहे. राष्ट्रीय तपास संस्था आणि ईडीने गुरुवारी देशभरात पीएफआयविरुद्ध राबविलेल्या सर्वात मोठ्या ऑपरेशनमध्ये पीएफआयशी संबंधित 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. एकूण 15 राज्यांमध्ये 93 ठिकाणी पीएफआयच्या कार्यालयांवर आणि संघटनेच्या काही नेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. या कारवाईत स्थानिक पोलिसांचाही समावेश होता. 

UP मध्ये संवेदनशील ठिकाणांवर आणि काही महत्वाच्या लोकांवर एकाच वेळी हल्ला करण्याचा होता कट- 
ईडीने पीएफआयवर 'देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला' धोक्यात' टाकणाऱ्या कारवाया केल्याचा आणि कट रचल्याचा आरोप केला आहे. तपासादरम्यान पीएफआय आणि त्याचे सदस्य, यांच्या बँक अकाउंट्सचे विश्लेषणही करण्यात आले आणि आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले.

Web Title: pfi planned to attack pm narendra modi on july 12 at patna rally in bihar sensational claims by ed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.