संपूर्ण पाक येणार ब्राह्मोसच्या टप्प्यात

By admin | Published: October 20, 2016 06:45 AM2016-10-20T06:45:58+5:302016-10-20T06:52:29+5:30

सतत त्रासदायक ठरणाऱ्या पाकिस्तानला प्रसंगी चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

In the phase of Brahmos, the whole of Pak | संपूर्ण पाक येणार ब्राह्मोसच्या टप्प्यात

संपूर्ण पाक येणार ब्राह्मोसच्या टप्प्यात

Next


नवी दिल्ली : सतत त्रासदायक ठरणाऱ्या पाकिस्तानला प्रसंगी चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग म्हणून फ्रान्सबरोबर राफेल लढाऊ विमानांचा तर रशियाकडून एस-४०० मिसाइल सिस्टीम खरेदीचा करार केल्यानंतर भारत आता रशियाबरोबर मिळून नव्या पिढीचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकसित करणार आहे.
या नव्या क्षेपणास्त्रांची रेंज ६०० किलोमीटरपेक्षाही अधिक असेल आणि अचूक लक्ष्य हे त्याचे वैशिष्ट्य असेल. नव्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रामुळे भारताला पाकिस्तानातील कोणत्याही ठिकाणाला सहजपणे लक्ष्य करता येईल. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण समूह (एमटीसीआर) मध्ये समावेश झाल्यामुळे भारताला हे तंत्रज्ञान प्राप्त होणार आहे. हवेतून, समुद्रातून तसेच जमिनीवरून याचा मारा करता येईल.
एमटीसीआरच्या नियमानुसार गटाचे सदस्य नसलेल्या देशांना ३०० किमीपेक्षा जास्त रेंजच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची विक्री करता येत नाही. भारतालाही एमटीसीआरचे सदस्यत्व मिळाल्यामुळेच हे करणे शक्य होत आहे. ब्राह्मोसची सध्याची क्षमता ३०० किलोमीटर आहे. या रेंजमध्ये पाकिस्तानात खोलवर लक्ष्यांना टार्गेट करता येत नाही. भारताकडे ब्राह्मोसपेक्षा जास्त रेंजची क्षेपणास्त्रे आहेत. पण ब्राह्मोसमध्ये विशिष्ट लक्ष्याला थेट टार्गेट करण्याची क्षमता आहे. 
पाकिस्तानबरोबर कुठल्याही प्रकारच्या युद्धात हे क्षेपणास्त्र गेमचेंजर ठरू ेशकेल. ब्राह्मोसमध्ये शत्रूच्या क्षेपणास्त्र सिस्टीमलाही भेदण्याची क्षमता आहे. ते एका वैमानिकरहीत लढाऊ विमानाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे लवकरच संपूर्ण पाकिस्तान ब्राह्मोसच्या टप्प्यात येणार आहे. 
या कराराविषयी चीनने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी चीनलाही हा करार आवडणारा नाही, हे स्पष्ट आहे.
भारतीय नौदलात सध्या सामिल असलेल्या ‘आयएनएस चक्र’सारखीच ‘अकुला-२’ वर्गातील आणखी एक आण्विक पाणबुडी रशिया भारतास भाडेपट्ट्यावर देणार आहे. या दोन अब्ज डॉलर खर्चाच्य पाणबुडी भाडेपट्टा कराराचा उल्लेख ‘वेदोमोस्ती’ या रशियन दैनिकाने दिले असून ही दुसरी आण्विक पाणबुडी सन २०२०-२१ मध्ये भारताला उपलब्ध होणार आहे. या कराराचा उल्लेखही भारताने केला नव्हता. हा विषय पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित असल्याने रशियातील या वृत्तावर भाष्य करण्यास संरक्षण मंत्रालय किंवा नौदलाने असमर्थता दर्शविली. ‘चक्र’ ही आण्विक पाणबुडी एप्रिल २०१२ मध्ये भारतीय नौदलात दाखल झाली. ती १० वर्षांसाठी भाड्याने घेण्यात आली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्रिक्स परिषदेसाठी गेल्या आठवड्यात भारतात आले असतानाच, हा करार करण्यात आला. मात्र अन्य करारांप्रमाणे या कराराची माहिती देण्यात आली नव्हती. रशियात गेल्यानंतर स्वत: पुतीन यांनीच या कराराविषयी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, आम्ही आमच्या भारतीय मित्राची सक्षमता वाढवू इच्छित असल्याचे या करारातून स्पष्ट होते, असेही त्यांनी बोलून दाखवले.
>आणखी एक आण्विक पाणबुडीही मिळणार
भारतीय नौदलात सध्या सामील असलेल्या ‘आयएनएस चक्र’सारखीच ‘अकुला-२’ वर्गातील आणखी एक आण्विक पाणबुडी रशिया भारतास भाडेपट्ट्यावर देणार असल्याचे वृत्त आहे.
‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन गोव्यात आले होते तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांत जे करार झाले त्यात दोन अब्ज डॉलर खर्चाच्या या पाणबुडी भाडेपट्टा कराराचाही समावेश होता, असे वृत्त ‘ वेदोमोस्ती’ या रशियन दैनिकाने दिले असून ही दुसरी आण्विक पाणबुडी सन २०२०-२१ मध्ये भारताला उपलब्ध होईल, असेही त्यात म्हटले आहे.

Web Title: In the phase of Brahmos, the whole of Pak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.