झारखंडमध्ये राजकीय घडामोड सुरू! चार आमदारांचे फोन बंद, मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 03:44 PM2024-02-01T15:44:53+5:302024-02-01T15:49:26+5:30

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

phones of four MLAs from the ruling group are switched off In Jharkhand | झारखंडमध्ये राजकीय घडामोड सुरू! चार आमदारांचे फोन बंद, मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

झारखंडमध्ये राजकीय घडामोड सुरू! चार आमदारांचे फोन बंद, मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांनी काल मुख्यमंत्रिदपदाचा राजिनामा दिला आहे. चंपई सोरेन यांनी काल राज्यपाल यांची भेट घेऊन मंख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी गटातील चार आमदारांचे फोन बंद असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

बिहारनंतर आता झारखंडमध्येही राजकीय खेळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी पक्षाला आमदारांकडून घोडे बाजाराची भीती वाटत आहे. दरम्यान, चंपई सोरेन यांना अद्याप राजभवनकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळालेले नाही. तर चंपई सोरेन यांनी ४३ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राजभवनाला पाठवले आहे. तर सत्ताधारी पक्षाच्या चार आमदारांचे फोन बंद आहेत. राजकीय उलथापालथीच्या भीतीने सुमारे ३५ आमदारांना हैदराबाद किंवा बंगळुरूला पाठवण्याची तयारी सुरू असून, त्यासाठी दोन चार्टर विमाने तयार आहेत.

1 मिनिट उशीर... बारावीच्या पेपरला न बसता आल्याने गोंधळ, लाठीचार्ज; ढसाढसा रडले विद्यार्थी

हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमधील राजकीय उलथापालथीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय चंपई सोरेन यांच्या मुख्यमंत्रिपदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेएमएमने चंपई सोरेन यांना राज्याचे पुढील मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला होता. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपई यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. हेमंत सोरेन यांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ईडीने त्यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक केली.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यापूर्वी हेमंत सोरेन यांची ईडीने त्यांच्या अधिकृत निवासस्थानी सात तास सखोल चौकशी केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ईडी कार्यालयात घेऊन गेले. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीच्या अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अटक करण्यापूर्वी एक व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केला होता.

Web Title: phones of four MLAs from the ruling group are switched off In Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.