सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मुंबईत हजारो उतरले रस्त्यावर?; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 10:43 PM2019-12-14T22:43:37+5:302019-12-14T22:43:41+5:30

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Photo of Eid procession in Bangladesh viral as CAB protest in Mumbai fact check | सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मुंबईत हजारो उतरले रस्त्यावर?; जाणून घ्या सत्य

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मुंबईत हजारो उतरले रस्त्यावर?; जाणून घ्या सत्य

Next

मुंबई: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या देशातल्या बहुतांश भागांमधील वातावरण पेटलं आहे. ईशान्य भारतामधील अनेक राज्यांमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलनं करत आहेत. त्याचा परिणाम कायदा सुव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे ईशान्य भारतात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. एकीकडे ईशान्य भारतामधील स्थिती बिघडली असताना दुसरीकडे मुंबईतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मुंबईत भव्य मोर्चा, हजारो नागरिक आंदोलनात सहभागी अशा मजकूरासह एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचं लोण मुंबईपर्यंत पसरल्याचा संदेश यातून पोहोचवला जात आहे. यामध्ये एका पुलाखाली हजारोंची गर्दी दिसत आहे. मात्र हा फोटो मुंबईतील नसल्याचं पडताळणीतून दिसून आलं. महिन्याभरापूर्वी बांगलादेशमध्ये हा फोटो टिपण्यात आला आहे. 



हैदराबाद स्टार न्यूज 72 नावाच्या फेसबुक पेजवरुन हजारोंच्या गर्दीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या पेजला १.६ लाख लोक फॉलो करतात. आतापर्यंत हा फोटो ३० हजार लोकांनी शेअर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोची सत्यता पडताळून पाहत असताना युट्यूबवर एक व्हिडीओ सापडला. त्यामध्ये फोटोत दिसणारं ठिकाण अगदी स्पष्ट दिसत आहे. १० नोव्हेंबर २०१९ रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. जश्न-ए-जुलूस या नावानं हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. 

Web Title: Photo of Eid procession in Bangladesh viral as CAB protest in Mumbai fact check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.