भाजपा नेत्याची करामत, प.बंगाल दंगलीसाठी वापरला गुजरात दंगलीचा फोटो

By admin | Published: July 9, 2017 08:16 PM2017-07-09T20:16:38+5:302017-07-09T20:18:42+5:30

शनिवारी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी जंतर-मंतर मैदानावर निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते

Photo of Gujarat riots, used for BJP's leader Karamat, West Bengal riots | भाजपा नेत्याची करामत, प.बंगाल दंगलीसाठी वापरला गुजरात दंगलीचा फोटो

भाजपा नेत्याची करामत, प.बंगाल दंगलीसाठी वापरला गुजरात दंगलीचा फोटो

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - एका फेसबूक पोस्टमुळे पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्हयात दोन गटात जातीय दंगल उसळली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी जंतर-मंतर मैदानावर निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी नवा प्रताप केल्याचे समोर आले आहे. कार्यकर्त्यांना ट्विटरद्वारे आवाहन करताना 2002 मध्ये गुजरातमध्ये भडकलेल्या दंगलींच्या फोटोचा वापर केला आहे. या प्रकारामुळे नुपूर शर्मा अडचणीत येण्याची शक्यता आहेत. 2014 मध्ये नुपूर शर्मा केजरीवाल विरोधात निवडणूकित उभ्या होत्या. नुपूर शर्माच्या या प्रतापामुळे राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता आहे.
नुपूर शर्मा यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये जमाव काही वाहनांची जाळपोळ करत असतानाचा आहे. त्यांच्या या पोस्टनंतर नेटीझन्सनी त्यांचा चांगलाच समाचर घेत त्यांना ट्रोल केलं आहे. यावेळी नेटिझन्सनी त्यांना हा फोटो पश्चिम बंगालमधील झालेल्या दंगलीतील नसून ते 2002 मधील गुजरात दंगलीचे असल्याची आठवण करून दिली.
पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोशल मीडियावरुन बनावट छायाचित्र व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला कोलकाता पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे.

आणखी वाचा -  

  ममता बॅनर्जी यांनी केंद्राला फटकारले
   दंगलग्रस्त भागात जवानांचे संचलन
 
पश्चिम बंगाल धगधगतोय....एका फेसबूक पोस्टमुळे जातीय हिंसाचार


काय आहे प्रकरण -
एका 17 वर्षीय विद्यार्थ्यांने फेसबूवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला होता. हा विद्यार्थी बदुरिया येथील राहणार आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जीना याप्रकऱणी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. परिस्थिती हाताबाहेर चालली असून केंद्राने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सुरक्षेसाठी पाठवलं आहे. नॉर्थ 24 परगणा येथील ही घटना आहे.

ममता बॅनर्जी यांनी केंद्राला फटकारले -
बशीरहाट व बदुरिया येथील वातावरण बिघडविण्यास आणि तिथे धार्मिक विद्वेष निर्माण करण्यास काही संघटना जबाबदार आहेत, असे सांगून, त्यांनी त्याबद्दलही नाव न घेता भाजपावर टीका केली. त्या म्हणाल्या, दोन धार्मिक संघटनांवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. बशीरहाट व बदुरिया येथील दंगलींची न्यायालयीन चौकशी केली जाईल. राज्यातील कायदा व सुव्यवस्था नीट राखण्यात केंद्र सरकार आम्हाला मदत करीत नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपा नेत्याची मागणी -
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपाच्या राज्य शाखेने केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, आम्ही राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली आणि राज्यातील गंभीर स्थितीसाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगितले.
दंगलग्रस्त भागातील लोकांना भरपाई देण्याची मागणीही भाजपाने केली आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करत नाही, हा ममता बॅनर्जी यांचा आरोपही घोष यांनी फेटाळून लावला.
 

Web Title: Photo of Gujarat riots, used for BJP's leader Karamat, West Bengal riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.