वृत्तपत्राने संशयित दहशतवादी म्हणून छापला राजदीप सरदेसाईंचा फोटो

By Admin | Published: September 23, 2016 09:43 PM2016-09-23T21:43:53+5:302016-09-23T21:56:31+5:30

ओडिसामधील 'संवाद' वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर शुक्रवारी सकाळी पत्रकार राजदीप सरदेसाईंचा फोटो चक्क संशयित दहशतवादी म्हणून छापण्यात आला होता

Photo of Rajdeep Sardesai, printed as a suspected terrorist by the newspaper | वृत्तपत्राने संशयित दहशतवादी म्हणून छापला राजदीप सरदेसाईंचा फोटो

वृत्तपत्राने संशयित दहशतवादी म्हणून छापला राजदीप सरदेसाईंचा फोटो

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
भुवनेश्रर, दि. 23 - ओडिसामधील 'संवाद' वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर शुक्रवारी सकाळी पत्रकार राजदीप सरदेसाईंचा फोटो झळकला. राजदीप सरदेसाईंचा हा फोटो पत्रकार म्हणून नाही तर चक्क संशयित दहशतवादी म्हणून छापण्यात आला होता. आपली ही घोडचूक लक्षात येताच वृत्तपत्राने ट्विटरच्या माध्यमातून माफीनामा प्रसिद्ध करत आपली चूक मान्य केली. राजदीप सरदेसाई यांनीदेखील माफी स्विकारत पहिल्या पानावर माफीनामा छापण्यास सांगितलं. 
 
रायगडमधील उरणमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी सशस्त्र संशयितांना पाहिल्याचा दावा केला होता. उरणमधील नौदल तळाच्या दिशेने हे संशयित गेल्याचं या मुलांनी सांगितलं होतं. ही बातमी या वृत्तपत्राने छापली होती. या बातमीत राजदीप सरदेसाई यांचा उल्लेख कुठेही करण्यात आला नाही. मात्र जे स्केच छापण्यात आलं आहे ते राजदीप सरदेसाईंचं आहे. 
 
राजदीप सरदेसाई यांनी ट्विटरवरील आपल्या विरोधकांवर आरोप करत वृत्तपत्रातील बातमी पुर्णपणे ट्विटरवरील माहितीच्या आधारे बनवली गेली असल्याचा आरोप केला आहे. 
 
राजदीप सरदेसाई यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेकदा टार्गेट करण्यात आलं आहे. ट्विटवर येणा-या आक्षेपार्ह मेसेजमुळे त्यांनी ट्विटर अकाऊंटही बंद केलं होतं. आपलं अकाऊंट हॅक झाल्याचा दावा राजदीप सरदेसाईंनी केला होता. चारित्र्यहनन थांबवण्यात यावं असं आवाहनही त्यांनी केलं होतं.
 

Web Title: Photo of Rajdeep Sardesai, printed as a suspected terrorist by the newspaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.